पुणे, 15 ऑगस्ट: स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari)पुण्यात (Pune) आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar),भाजपचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) आणि काँग्रेस नेते शरद रणपिसेही (Sharad Ranpise) उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर राज्यपाल भेटीगाठी घेत असताना काँग्रेसचे विधान परिषदेतील नेते शरद रणपिसे यांनी राज्यपालांना 12 आमदारांच्या नियुक्ती बाबत छेडलं. त्यानंतर राज्यपालांनी खास शैलीत उत्तर दिलं.
Deputy Chief Minister Ajit Pawar, Divisional Commissioner Saurabh Rao, Police Commissioner Amitabh Gupta, Collector Dr Rajesh Deshmukh, senior officials and citizens from various walks of life were present. pic.twitter.com/kQEKgtv073
— Governor of Maharashtra (@maha_governor) August 15, 2021
राज्यपाल काय म्हणाले? माझ्यासोबत अजित पवार आहेत. ते माझे मित्र आहेत. सरकार आग्रह धरत नाही तुम्ही का धरता? असा सवाल राज्यपालांनी केला. असा सवाल करत राज्यपालांनी गुगली टाकली. कोणी दिली मुंबई विद्यापीठाला बॉम्बस्फोटाची धमकी?, समोर आलं सत्य अजित पवार म्हणाले राज्यपालांनी दिलेल्या उत्तरावर उपमुख्यमंत्री अजित पवार हसत हसत म्हणाले, आज स्वातंत्र्य दिन आहे. या विषयावर नंतर बोलेन म्हणत राज्यपालांनी टाकलेला बॉल सोडून दिला.