मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबई विद्यापीठाला ईमेलव्दारे बॉम्बस्फोटाची धमकी देणारा बीकॉमचा विद्यार्थी, सायबर पोलिसांनी लावला छडा

मुंबई विद्यापीठाला ईमेलव्दारे बॉम्बस्फोटाची धमकी देणारा बीकॉमचा विद्यार्थी, सायबर पोलिसांनी लावला छडा

बीकॉम अभ्यासक्रमाचा निकाल (Result)लवकर न लावल्यास कॅम्पस बॉम्बनं उडवण्याची धमकी (Threat) देण्यात आली होती.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 15 ऑगस्ट: मुंबई विद्यापीठाला (Mumbai University) बॉम्बस्फोटाची (Bomb Blast) धमकी देणारा दुसरा, तिसरा कोणी नसून बीकॉमचा विद्यार्थी (Bcom Student) असल्याचं समोर आलं आहे. बीकॉम अभ्यासक्रमाचा निकाल (Result)लवकर न लावल्यास कॅम्पस बॉम्बनं उडवण्याची धमकी (Threat) या विद्यार्थ्यांनं दिली होती.

टीव्ही 9 नं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. प्रलंबित निकालामुळे मानसिक तणावात असलेल्या या विद्यार्थ्यानं शिवीगाळ असलेला ईमेल मुंबई विद्यापीठाला पाठवला होता. सायबर पोलिसांनी (Cyber Police) या विद्यार्थ्यांना शोध घेतला. त्यानंतर या विद्यार्थ्याला वॉर्निंग आणि नोटीस देत सोडून दिलं आहे.

नेमकी घटना काय?

मुंबईतील बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये मुंबई विद्यापीठाला 9 आणि 10 जुलैला आलेल्या ईमेल प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. या तपासादरम्यान पोलिसांना या विद्यार्थ्याचा शोध लागला.

Video:स्वातंत्र्यदिनी राज्यात धक्कादायक घटना,  तीन ठिकाणी आत्मदहनाचा प्रयत्न

कॉमर्सच्या विद्यार्थ्यानं सायबर कॅफेमधून विद्यापीठाला हा धमकीचा ईमेल पाठवला होता. तपासादरम्यान हा ईमेल खोट्या तपशीलांच्या आधारे तयार करण्यात आला होता. तसंच खोट्या ईमेल आयडीवरुन पाठवलेला बनावट मेल असल्याचं समोर आलं.

पोलिसांनी तपास करुन आरोपीला अटक केली. मात्र आरोपी हा बीकॉमचा विद्यार्थी असून सध्या मानसिक तणावात असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्याला नोटीस देऊन सोडून दिलं गेलं.

First published:

Tags: Mumbai News