जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / माफिया अतिक अहमदच्या मुलाचं पुणे कनेक्शन, धक्कादायक माहिती समोर आल्यानं एकच खळबळ

माफिया अतिक अहमदच्या मुलाचं पुणे कनेक्शन, धक्कादायक माहिती समोर आल्यानं एकच खळबळ

फाईल फोटो

फाईल फोटो

प्रयागराजचा माफिया डॉन आणि माजी खासदार अतिक अहमद याचा मुलगा असद याचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आले आहे.

  • -MIN READ Local18 Pune,Maharashtra
  • Last Updated :

वैभव सोनवणे पुणे, 14 एप्रिल : उत्तरप्रदेशमधील प्रयागराजचा माफिया डॉन आणि माजी खासदार अतिक अहमद याचा मुलगा असद अहमद याचा गुरुवारी यूपी पोलिसांच्या एसटीएफसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. झाशीतील या चकमकीत असदसोबत आणखी एक कुख्यात शूटर गुलामही मारला गेला. पण यानंतर आता अतिक अहमदचं पुणे कनेक्शन समोर आले आहे.

News18लोकमत
News18लोकमत

एकेकाळी पंडित नेहरू ज्या लोकसभा मतदार संघातून निवडून आले होते, त्या मतदारसंघातून आपल्या दहशतीच्या जोरावर आतिक अहमद निवडून आला होता. त्याने उत्तरप्रदेशमध्ये 100 पेक्षा जास्त गुन्हे केले आहेत. त्यानंतर राजकारणाची झालर ओढून तो स्वत:ला इतकी वर्ष वाचवत राहिला. मात्र, आता त्याचाच सहकारी राज पाल याच्या हत्येच्या प्रकरणात मुख्य साक्षीदार असलेल्या उमेश पाल याची काही दिवसांपूर्वी आतिक अहमद चा मुलगा असद अहमद याने हत्या केली होती आणि तेव्हापासून तो फरार होता. यूपी एसटीएफने धडाकेबाज कारवाई करत युपीचा कुख्यात गुंड आतिक अहमद याच्या मुलाचा एन्काऊंटरमध्ये खात्मा केला आहे. अतीक अहमदचा मुलगा असद याचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आले आहे. तसेच अतिकचा मुलगा असद यानं, उत्तर प्रदेश STF च्या कारवाई पासून वाचण्यासाठी महाराष्ट्रातील नाशिक आणि पुणे जिल्ह्यात आश्रय घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र ATS आता, असदला आश्रय देणाऱ्याच्या शोध घेत आहेत. आंतरराष्ट्रीय माफिया डॉन अबू सालेमच्या निकटवर्तीयांनी, अतिकचा मुलगा असद याला आश्रय दिला होता, अशी सूत्रांची माहिती आहे. अतिक अहमदचे अबू सालेमशी जुने संबंध आहेत. त्यामुळे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अबू सालेमच्या गुंडांनी असदला वाचविण्यासाठी मदत केली होती. अबू सालेम हा 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी असून तो मुंबईच्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगतो आहे. तर असद अहमद हा काही दिवस पुण्यात आणि नाशिक मध्ये राहून केल्याचा युपी एसटीएफला संशय आहे. त्यानुसार महाराष्ट्र एटीएस शोध घेत असल्याचे समजत आहे. यासाठी असद अहमद ला अबू सालेम शी संबंधित व्यक्तींनी मदत केल्याचीही तपास अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात