Home /News /maharashtra /

वहिनीनं शेतात बोलावलं म्हणून डोक्यात कुऱ्हाडीने केले सपासप वार, दिरानं नंतर उचललं टोकाचं पाऊल

वहिनीनं शेतात बोलावलं म्हणून डोक्यात कुऱ्हाडीने केले सपासप वार, दिरानं नंतर उचललं टोकाचं पाऊल

वहिनीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून दिराने खुन केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

    हिंगोली, 23 जुलै : हिंगोली तालुक्यातील जोडतळा इथे शेतामध्ये भोजनासाठी बोलवणाऱ्या वहिनीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून दिराने खुन केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. यानंततर दिरानेही विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दिराला हिंगोलीच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हिंगोली तालुक्यातील जोडतळा इथल्या सविता संजय जाधव ( 30) या गावातील इतर महिलांसोबत जोडतळा शिवारातील एका शेतात निंदण्याच्या कामासाठी गेल्या होत्या. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सर्व महिला शेतात झाडाखाली बसून जेवण करीत होत्या. ज्या चिमुकल्यांना 9 महिने वाढवलं त्यांचाच आवळला गळा, नंतर आईचं धक्कादायक पाऊल यावेळी त्या ठिकाणी रामेश्वर ऊर्फ माधव जाधव हा देखील आला. त्याला पाहताच सविता जाधव यांनी जेवण्यासाठी बोलावलं. मात्र, त्याने सविता जाधव यांच्या जवळ येऊन मागचा-पुढचा विचार न करता त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने सपासप वार केले. यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. अनलॉकनंतर आता पुन्हा लॉकडाऊन होणार का? राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती या घटनेनंतर सविता जाधव यांचा दीर रामेश्वर उर्फ माधव जाधव यानेही विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला तातडीने हिंगोली इथल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या खाजगी रुग्णालयासमोर पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. त्याची प्रकृती सुधारत असल्याचं सांगण्यात आलं आहे. प्रत्येक पालकासाठी अतिशय महत्त्वाची बातमी, महाराष्ट्र सायबरनं केलं आवाहन पोलिसांनी शेतातून सविता यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवला आहे. पोलीस सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून शेजारी आणि प्रत्येक्षदर्शींची यामध्ये चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. पण भर दिवसा अशा प्रकारे महिलेची हत्या झाल्यामुळे संपूर्ण गावात भीतीचं वातावरण आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या