• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील कार-कंटेनरच्या भीषण अपघाताचा Live Video; आई-वडील व मुलाचा जागेवरच मृत्यू

मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील कार-कंटेनरच्या भीषण अपघाताचा Live Video; आई-वडील व मुलाचा जागेवरच मृत्यू

ही कार पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत होती. हा अपघात इतका भीषण होता की, कारने तत्काळ पेट घेतला

 • Share this:
  खोपोली, 2 जुलै : मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai Pune Express way) 1 जुलै रोजी भीषण अपघात झाला होता. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला होता. एका कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने कारला धडक दिली होती. (Mumbai Pune Expressway Accident) हा अपघात इतका भीषण होता की, कारला आग लागली व त्यात आई-वडील व मुलाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाला आहे. खंडाळा घाटातील खोपोली एक्झिट ते फुडमॉल दरम्यानच्या तीव्र उतारावर ही दुर्घटना घडली होती. आता या अपघाताचा लाइव्ह व्हिडीओ (Accident Live Video) समोर आला आहे. (horrific car container accident on the Mumbai Pune Express ) मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कारला एका कंटेनर चालकाने खोपोली एक्झिट ते फुडमॉल दरम्यानच्या किलोमीटर क्रमांक ३७ येथील तीव्र उतारावर धडक दिली होती. कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कंटेनरले केवळ कारला धडकच दिली नाही तर तो अक्षरण: कारवर चढला. यामध्ये कारचा चेंदामेंदा झाला व कारने जागीच पेट घेतला. हे ही वाचा-सुधारगृहातील एग्जॉस्ट फॅनच्या छिद्रातून देह विक्रय व्यवसायातील 10 तरुणींचं पलायन मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून या अपघातात आई-वडील आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच बोरघाट (दस्तुरी) महामार्गावरील पोलीस तातडीने घटनास्थळी हजर झाले होते. कारला आग लागल्यामुळे तातडीने अग्निशमन बंब बोलावण्यात आले व कार विझवण्यात आली. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अद्याप मृतांची नावं समजू शकलेली नाही. मात्र हे तिघे पुण्याहून मुंबईच्या दिशेने प्रवास करीत होते. तेव्हा त्यांच्यावर काळाने घाला घातला.
  Published by:Meenal Gangurde
  First published: