मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

...तर तुमच्या घरात कचरा आणून टाकेन, शिवसेना नेत्यानं अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

...तर तुमच्या घरात कचरा आणून टाकेन, शिवसेना नेत्यानं अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात एका बाजुला कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात एका बाजुला कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात एका बाजुला कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

कल्याण, 7 जून:  कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात एका बाजुला कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तर दुसऱ्या बाजुला घनकचऱ्याची समस्या उद्भवली आहे. यामुळे साथीचे आजार आणखी पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात ठिकठिकाणी कचरा साचल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. शहर तत्काळ स्वच्छ झालं नाही तर तुमच्या घरात कचरा आणून टाकेन, अशा शब्दांत शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आहे.

हेही वाचा.. कोरोना व्हायरसचा नायनाट करणारी लस लवकरच, 'या' फार्मा कंपनीनं केला करारकल्याण पूर्वेत सुद्धा अनेक ठिकाणी कचरा पडला असून तो रस्त्यावर आला आहे. यामुळे साथीचे रोगही फैलावण्याची शक्यता आहे. नागरीकांच्या या तक्रारींकडे संबंधीत अधिकारी ऐकत नसल्याने आणि लोकप्रतिनिधीच्या सुचनेकडे लक्ष देत नसल्याने नगरसेवक महेश गायकवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कचरा कुंडीचा ठिकाणी बोलावून त्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. ही बाब गांभीर्याने घ्या, अशी तंबीही अधिकाऱ्यांना दिली.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या घन कचरा निर्मुलनाच्या उपायुक्त पदाची नुकतीच सुत्रे हाती घेतलेले उपायुक्त रामदास कोकरे यांनी ऐन कोरोना संकटाच्या काळात कल्याण डोंबिवली महापालिका कचरामुक्त करण्याचा संकल्प सोडला. या संकल्पने अंतर्गतच बहुतांशी ठिकाणच्या कचरा कुंड्या उचलुन नेल्या आहेत. त्याऐवजी नागरीकांनी घंटा गाडीमध्ये ओला आणि सुका कचरा वेग वेगळा करून देण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर दुर्गाडी जवळील डंपींग ग्राऊडवर कचरा संकलनही बंद करण्यात आले आहे. कल्याण डोंबिवली काही ठिकाणी नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद दिला जात आहे तर काही ठिकाणी नागरिकांना समस्या येत आहे. तर कल्याण पूर्वेत विविध ठिकाणच्या कचरा कुंड्या उचलून नेल्या आहेत. परंतु काही नागरीक आणि व्यापारीही त्याचठिकाणी कचरा टाकत असल्याने हाच कचरा संबंधीत कर्मचाऱ्यांकडून वेळीच उचलला जात नसल्याच्या नागरीकांकडून तक्रारी वाढू लागल्या आहेत. तर सदर पडलेला कचरा आता उचलला आहे, असे केडीएमसी अधिकारी यांनी सांगितले आहे.

हेही वाचा... मोठी बातमी! कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चीनलाही मागे टाकू शकतो महाराष्ट्र

First published:

Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus