पुणे, 26 जानेवारी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक जडणघडणीचा साक्षीदार असलेला आणि शाहिस्तेखानाला थोटक्या हाताने जाताना पाहणारा लाल महाल (lal mahal ) हा पुणे महापालिकेच्या (pune municipal corporation) ढिसाळ कारभारामुळे गेली पाच वर्ष देखभाल दुरुस्ती च्या नावाखाली बंद आहे. त्यामुळे राज्यभरातून येणाऱ्या शिवप्रेमीना निराश होऊन परतावं लागतं आहे.
पुण्याच्या ऐतिहासिक समृद्धीत अनन्य महत्व असलेला लाल महाल हा गेले पाच वर्ष झाले, दुरूस्तीच्या कामाच्या नावाखाली बंद आहे. महानगरपालिकेतील सत्ताधार्यांच्या नाकर्तेपणामुळे आणि स्थानिकांच्या राजकारणामुळे लालमहाल जाणीवपूर्वक बंद ठेवला आहे. महानगरपालिका प्रशासन शहाजी महाराज स्मृती दिनी सुद्धा लाल महाल उघडत नाहीत. त्यावर कुठल्याही नगरसेवकांकडून साधा आक्षेप ही नोंदवण्यात आलेला नाही. त्यामुळे पुण्यात सोन्याचा नांगर फिरवणाऱ्या जिजाऊंसह बाल शिवाजी पाच वर्ष झाले कुलपाच्या आत बंद आहे.
सायबर हल्ल्यापासून रोखण्यासाठी मुंबईला आता 5 नवे 'हायटेक कवच'
लाल महाल पाहण्यासाठी कुटुंबासह देशभरातून अनेक पर्यटक येतात, शनिवावाड्यासमोर लालमहलाची चौकशी करतात मात्र दुरुस्तीच्या नावाखाली बंद असलेल्या लाल महालाच्या दरवाजावर त्यांना अत्यंत वाईट वागणूक देऊन काढून दिल्या जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.
लाल महालाच्या कामाला सुरुवात होऊन महापालिकेत चार महापौर बदलले. अजूनही हे काम पूर्ण होऊ शकलेल नाही आणि जे झालंय त्याची अवस्था पुन्हा खराब व्हायला लागली आहे. मात्र, काम तर पूर्ण झालंय लवकरच लाल महाल खुला करू असं आश्वासन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले.
महापौरांच्या मध्यस्थीनंतर पाच वर्षानंतर आता तरी लाल महालाची दारं उघडतील आणि जिजाऊ माँसाहेब आणि बाल शिवाजी च्या सोन्याचा नांगर झालेल्या प्रतिमांचे लाल महालाचा नागरिकांना दर्शन घेता येईल, अशी अपेक्षा करूया अन्यथा शिवप्रेमींकडून कठोर आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे.
मृत्यूशी लढतेय 5 महिन्यांची तीरा कामत; 16 कोटींचं इंजेक्शन दिलं तरच वाचेल जीव!
लाल महालात इतके वर्ष नेमक कशाच दुरुस्तीच काम सुरू होतं? या कामाचा दर्जा काय होता? आणि त्यासाठी खरंच पाच वर्षे लागतात का? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. लाल महालाचे महत्त्व हे पर्यटनाच्या दृष्टीने मोठा आहे शनिवार वाड्याला एका महिन्यात जवळपास एक लाख लोक भेट देतात. ही सगळी लोकं गेली पाच वर्षे लाल महालात जाऊ शकत नाही. त्यातून निर्माण होणारा महसूलही बुडतो आहे महापालिकेतल्या सत्ताधारी आणि प्रशासनाने किमान तेवढे तरी लक्षात घ्यावं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.