मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Kiran Gosavi : किरण गोसावीला 8 दिवसांची पोलीस कोठडी

Kiran Gosavi : किरण गोसावीला 8 दिवसांची पोलीस कोठडी

किरण गोसावी (Kiran Gosavi) याच्यावर फसवणुकीचे विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांनी (Pune Police) किरण गोसावी याला पहाटे एका लॉजमधून अटक केली होती.

किरण गोसावी (Kiran Gosavi) याच्यावर फसवणुकीचे विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांनी (Pune Police) किरण गोसावी याला पहाटे एका लॉजमधून अटक केली होती.

किरण गोसावी (Kiran Gosavi) याच्यावर फसवणुकीचे विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांनी (Pune Police) किरण गोसावी याला पहाटे एका लॉजमधून अटक केली होती.

पुणे, 28 ऑक्टोबर : मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी आणि आर्यन खान (Aryan khan drug case) प्रकरणातील एनसीबीचा पंच साक्षीदार किरण गोसावीला (Kiran Gosavi) पुणे पोलिसांनी अटक केली. त्यानंतर किरण गोसावीला न्यायालयात हजर करण्यात आले, त्यावेळी न्यायालयाने त्याला 8 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. किरण गोसावीवर 2018 मधील एका प्रकरणात ही कारवाई झाली आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta) यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली होती. पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणाले, मी सर्वांना आवाहन करतो की, ज्या-ज्या नागरिकांची फसवणूक किरण गोसावीने केली आहे त्यांनी पुढे यावे आम्ही गुन्हे दाखल करू.

किरण गोसावी याच्याविरोधात ठाणे, कळवा, अंधेरी, पालघर अशा अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत. किरण गोसावीने अनेक तरुणांची फसवणूक केली आहे. या सर्व प्रकरणांचा तपास करण्यासाठी किरण गोसावीची 10 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी सरकारी वकिलांची मागणी केली होती.

सचिन पाटील नावाने वावरत होता Kiran Goasavi, पुणे पोलिसांनी लॉजमधून केली अटक

 बऱ्याच ठिकाणी गेल्या 10 दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी तो फिरत होता. यामध्ये लखनऊ, फतेहपूर, तेलंगणा, जबलपूर, जळगाव, मुंबई, पनवेल, लोणावळा या ठिकाणांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी पुणे पोलिसांच्या टीम गेल्या होत्या. हा पळत होता तेव्हा तो सचिन पाटील या नावाने सर्वत्र जात होता. सचिन पाटील (Sachin Patil) या नावाने हॉटेलमध्ये राहत होता. आपण स्टॉप क्राईम एन्जीओचा प्रतिनिधी असल्याचंही तो सांगतो. ही प्राथमिक माहिती मिळाली आहे आम्ही याची खातरजमा आणि चौकशी करत आहोत असंही पोलिसांनी सांगितलं.

किरण गोसावीचा अटक होण्यापूर्वीचा VIDEO आला समोर

तक्रारदार चिन्मय देशमुखला गोसावीने धमकावलं होतं त्याप्रकरणीही गुन्हा दाखल करणार आहोत. एनसीबी किंवा मुंबई पोलिसांनी किरण गोसावीच्या कस्टडीची मागणी केलेली नाहीये. जर तशी मागणी केली तर आम्ही त्याचा ताबा देण्याबाबत विचार करू असंही पुणे पोलिसांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Aryan khan, Pune, Pune crime