• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • सचिन पाटील नावाने वावरत होता Kiran Goasavi, पुणे पोलिसांनी लॉजमधून केली अटक

सचिन पाटील नावाने वावरत होता Kiran Goasavi, पुणे पोलिसांनी लॉजमधून केली अटक

पोलिसांना गुंगारा देत 'या' नावाने वावरत होता किरण गोसावी, पुणे पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या

पोलिसांना गुंगारा देत 'या' नावाने वावरत होता किरण गोसावी, पुणे पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या

Pune Police pc on Kiran Gosavi arrest: किरण गोसावीला अटक केल्यानंतर पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा केला आहे.

  • Share this:
पुणे, 28 ऑक्टोबर : मुंबईतील क्रूझ पार्टी प्रकरणात (Mumbai Cruise party case) एनसीबीचा पंच किरण गोसावी (NCB witness Kiran Gosavi) याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. किरण गोसावी याच्यावर फसवणुकीचे विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांनी किरण गोसावी याला पहाटे एका लॉजमधून अटक केली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta) यांनी पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा केला आहे. पुणे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पहाटेच्या सुमारास कात्रजमधील एका लॉजमधून किरण गोसावी याला अटक करण्यात आली आहे. त्याने आत्मसमर्पण केले नसून अटक करण्यात आली आहे. नोकरीचं आमिष दाखवत त्याने अनेकांची फसवणूक केली आहे. गोसावीला कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्याने आणकी काही नागरिकांची फसवणूक केली असल्याची माहिती समोर येत आहे. सचिन पाटील नावाने वावरत होता बऱ्याच ठिकाणी गेल्या 10 दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी तो फिरत होता. यामध्ये लखनऊ, फतेहपूर, तेलंगणा, जबलपूर, जळगाव, मुंबई, पनवेल, लोणावळा या ठिकाणांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी पुणे पोलिसांच्या टीम गेल्या होत्या. हा पळत होता तेव्हा तो सचिन पाटील या नावाने सर्वत्र जात होता. सचिन पाटील (Sachin Patil) या नावाने हॉटेलमध्ये राहत होता. आपण स्टॉप क्राईम एन्जीओचा प्रतिनिधी असल्याचंही तो सांगतो. ही प्राथमिक माहिती मिळाली आहे आम्ही याची खातरजमा आणि चौकशी करत आहोत असंही पोलिसांनी सांगितलं. तक्रारदार चिन्मय देशमुखला गोसावीने धमकावलं होतं त्याप्रकरणीही गुन्हा दाखल करणार आहोत. एनसीबी किंवा मुंबई पोलिसांनी किरण गोसावीच्या कस्टडीची मागणी केलेली नाहीये. जर तशी मागणी केली तर आम्ही त्याचा ताबा देण्याबाबत विचार करू असंही पुणे पोलिसांनी म्हटलं आहे. पुणे पोलिसांचे आवाहन पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणाले, मी सर्वांना आवाहन करतो की, ज्या-ज्या नागरिकांची फसवणूक किरण गोसावीने केली आहे त्यांनी पुढे यावे आम्ही गुन्हे दाखल करू. किरण गोसावीचा अटक होण्यापूर्वीचा VIDEO आला समोर पुणे पोलिसांनी अटकेची कारवाई करण्यापूर्वीचा किरण गोसावीचा एक व्हिडीओ (Kiran Gosavi Video) समोर आला आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईलने केलेल्या वसुलीच्या आरोपांनंतर किरण गोसावी फरार झाला होता. अखेर त्याला पोलिसांनी अटक कलेी आहे. अटकेपूर्वीचा किरण गोसावीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओतून किरण गोसावी याने आपल्यावरील आरोप फेटाळले असून प्रभाकर साईल आणि त्याच्या दोन भावांची चौकशी करण्याची मागणी या व्हिडीओतून किरण गोसावीने केली आहे. आपल्या व्हिडीओ किरण गोसावी सांगत आहे की, प्रभाकर साईल जो काही सांगत आहे की "पैशांच्या देवण-घेवाणवरुन, सॅम डिसोझा सोबत संभाषण कुणाचं संभाषण झालं आहे. कोणी किती पैसे घेतले आहेत. प्रभाकर साईलला गेल्या पाच दिवसांत काय ऑफर आल्या आहेत हे त्याच्या मोबाइलवरुन समजेल. प्रभाकर साईल आणि त्याचे दोन्ही भाऊ यांचे सीडीआर रिपोर्ट आणि मोबाइल चॅट काढावेत. माझे सुद्धा त्याच्यासोबतचे चॅट काढावेत. माझा इम्पोर्ट-एक्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यामुळे पूर्वीचे काही चॅट्स असतील ज्यात पैशांच्या देवाण-घेवाण बाबत म्हटलं आहे. पण 2 तारखेनंतरचे याचे चॅट्स तपासावेत. मुंबई पोलिसांनी याची चौकशी करावी, डिलिट केलेले चॅट काढावे. याच्या मागे कोण आहे याचीही चौकशी करावी. यांचे फोन रेकॉर्ड्स काढा सर्व गोष्टी समजतील. त्याने केलेले सर्व आरोप खोटे आहेत."
Published by:Sunil Desale
First published: