पुणे, 14 ऑक्टोबर: पुणे पोलिसांनी (Pune Police) किरण गोसावी (Kiran Gosavi) याच्या विरोधात लूकआऊट (Lookout Notice) नोटीस जारी केली आहे. किरण गोसावी हा मुंबईतल्या क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातला साक्षीदार आहे. गोसावी हा पुणे पोलिसांकडे दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार आरोपी आहे. त्यामुळे तो भारताबाहेर पळून जाण्याची शक्यता असल्यानं त्याच्या विरोधात पोलिसांनी लूकआऊट नोटीस काढली आहे.
बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेमुळे किरण गोसावी चर्चेत आला. राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे किरण गोसावी पुरत्या कोंडीत अडकला. मलिकांनी पत्रकार परिषद घेऊन व्हिडिओ दाखवला त्या व्हिडिओत गोसावी आर्यन खानला घेऊन जाताना दिसला. त्यानंतर एनसीबीनं गोसावी पंच साक्षीदार असल्याचं म्हटलं. आर्यनसोबत काढलेला गोसावीचा सेल्फीही व्हायरल झाला.
गोसावी विरोधात फसवणुकीचा गुन्हा
फरासखाना पोलीस ठाण्यात गोसावीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचं पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी सांगितलं. 2018 मध्ये गोसावीवर पुण्यात फरासखान पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होती. याप्रकरणी पुण्यातल्या एका तरुणानं तक्रार दाखल केली होती.
काय आहे नेमकं प्रकरण
2018 मध्ये गोसावी याने आपल्या फेसबुक अकाऊंटवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी असण्यासंदर्भात पोस्ट टाकली होती. त्या पोस्टवर चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता. त्यांच्याकडून तीन लाख रुपये घेऊन गोसावीने त्याला मलेशियाला पाठविले. मात्र, तेथे नोकरी न दिल्यानं तो भारतात परत आला. त्यानंतर त्याने फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली होती. या गुन्ह्यात गोसावी फरार आहे. त्यामुळे आता या फसवणुकी संदर्भात फरासखाना पोलीस सध्या किरण गोसावी याचा शोध घेत आहेत.
हेही वाचा- सेलिब्रेशनची तयारी सुरू, पुढच्या आठवड्यात भारत देश करणार नवा विक्रम
फिर्यादी चिन्मय देशमुख यानं सांगितलं, किरण गोसावी याने आपल्यासह पालघर, मुंबई, आंध्र प्रदेश येथील अनेकांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक केली आहे. दिल्लीतील तरुणांनाही त्याने फसवले आहे. त्यामुळे दिल्ली पोलीसही त्याच्या मागावर आहेत.
Aryan Khan मुलगा कुठून ड्रग्स घ्यायचा NCB ने केला मोठा खुलासा
आर्यन खानला (Aryan Khan Drug Case)ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय घेण्याचे अधिकारक्षेत्र नसल्याचे कारण देत त्यांची याचिका फेटाळल्यानंतर हे प्रकरण विशेष न्यायालयात झाले होते. त्यांनतर यावर काल 13 ऑक्टोबर दिवशी सुनावणी सुरु आहे.
दरम्यान NCB ने खुलासा करत सांगितलं आहे, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा आपला मित्र आणि या प्रकरणातील आणखी एक आरोपी असणारा अरबाजकडून कॉन्ट्राबँड खरेदी करत असे. तसेच आर्यन खान औषधांच्या बेकायदेशीर खरेदीसाठी 'आंतरराष्ट्रीय औषध नेटवर्क'चा भाग असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात असल्याचा दावा NCB ने केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aryan khan, Shah Rukh Khan