पुणे, 2 जून: पुणे जिल्ह्यात जुन्नरमध्ये टोमॅटो पिकावर 5 ते 6 प्रकारचे व्हायरस आढळून आल्याचं समोर आलंय. टोमॅटोचा हब अशी ओळख असलेल्या आणि उन्हाळी हंगामात उत्तर भारताला सर्वाधिक टोमॅटो निर्यात करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव परिसरात यंदा टोमॅटो पिकावर प्रथमच एवढे व्हायरस आढळून आले आहेत. गेल्या 15 दिवसांपासून ठिकठीकणच्या शेतकऱ्यांना या रोगाची लक्षणे आढळल्याने कृषी विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या टोमॅटो तोडणी सुरू झाली आणि संपूर्ण पिकावरच विविध विषाणूजन्य आजार आल्याने फळे लाल होण्याऐवजी जागेवरच पिवळ्या रंगाची होऊन खराब होऊ लागली आहेत. या आजाराला 'प्लॅस्टिक टोमॅटो' म्हणलं जात आहेत. पाहा VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Pune, Tomato, Virus