असे सांगितले जात आहे की धर्मेंद्र सोनकर दुपारी त्यांच्या घरासमोर मंदिराशेजारी आपल्या एका साथीदारासमवेत बसले होते, त्यावेळी परिसरातील कुख्यात बदमाश मोनू सोनकर आपल्या साथीदारांसह आला आणि त्याने गोळ्या झाडून पळून गेला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे धर्मेंद्र स्वत:ला वाचवण्यासाठी घराकडे धावले, परंतु तोपर्यंत त्यांच्या छाती आणि मांडीला दोन गोळ्या लागल्या, तर धर्मेंद्र यांच्या जोडीदाराच्या पायाला गोळी लागली. यानंतर धर्मेंद्र यांनी घरातून रिवॉल्व्हर घेऊन आरोपीच्या मागे पळ काढला. पण तोपर्यंत मोनू सोनकर आपल्या साथीदारांसह तेथून पळून गेला. धर्मेंद्र यांचा आवाज ऐकून त्यांचे कुटुंब बाहेर आले आणि त्यांनी धर्मेंद्र सोनकर यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. जिथे डॉक्टर ऑपरेशन करीत असताना त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच धर्मेंद्र सोनकर यांचे समर्थक मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी सर्वांना परत पाठविले. आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी वैद्यकीय रुग्णालयात पाठविला. आरोपी मोनू सोनकर याची पोलिस चौकशी करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोनू सोनकर आणि धर्मेंद्र सोनकर यांच्यात बराच काळ जमीनीचा वाद होता.lockdown असतानाही काँग्रेस नेत्याचा खून, live video pic.twitter.com/SBWJkwVbro
— renuka dhaybar (@renu96dhaybar) March 28, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.