आसाम, 28 मार्च : लॉकडाऊन असतानाही लोकांनी सामान खरेदीसाठी गर्दी केल्यामुळे पोलिसांनी गोळीबार केल्याचं समोर आलं आहे. सामान खरेदीसाठी असंख्य लोकांनी गर्दी केली आणि त्यातील काही लोकांनी पोलिसांवरच दगडफेक केल्याने नाईलाजास्तव पोलिसांना गोळीबार करावा लागला आहे. यामध्ये पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून 60 जणांना जोरहाट जिल्ह्यात अटक केली आहे. आसाममधील बोंगागाव जिल्ह्यामध्ये हा प्रकार घडला आहे. बोंगागाव जिल्ह्यात पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला आणि जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्जही करावा लागला. शेकडो लोक बौदी मार्केटमध्ये भाजीपाला खरेदी करण्यासाठी आणि विक्रीसाठी जमले होते. पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. एकीकडे लोक गर्दी करण्याचं कमी करत नाहीत तर दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये आणखी नवे कोरोनाचे 05 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर नागपुरात एका रुग्णाच्या टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं आता एकूण रुग्णांची संख्या 159 वर पोहोचली आहे. शुक्रवारी दिवसभरात मुंबईतील भाभा आणि कस्तुरबा रुग्णालयात 9 रुग्णांची नोंद झाली. मुंबईत आता कोरोनाग्रस्तांची संख्या 91 झाली आहे. तर आतापर्यंत मुंबईत 05 जणांचाा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत संशयित रुग्णांसह 209 कॉरोनाग्रस्त दाखल आहेत. शुक्रवारी दिवसभरात एकूण 17 नवीन रुग्ण आढळले होते. सांगलीमध्ये नवे 12 रुग्ण तर नागपूरमध्ये 5 रुग्ण आढळले असून राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्याही तब्बल 159 वर पोहोचली आहे. नवी मुंबईत दीड वर्षाच्या बाळाला कोरोनाची लगण झाली आहे. देशभरात कोरोना व्हायरसचा धोका भारतात वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत एकूण 830 हून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर देशभरात आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 67 रुग्ण बरे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागानं दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.