Home /News /pune /

जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवर अजितदादांची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...

जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवर अजितदादांची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...

महाविकास आघाडी सरकारने जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचे आदेश देऊन भाजपला दणका दिला आहे.

    पुणे, 16 ऑक्टोबर : महाविकास आघाडी सरकारने जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचे आदेश देऊन भाजपला चांगलाच दणका दिला आहे. ही चौकशी SIT मार्फत होणार आहे. तर 'सरकार कुणाचेही असताना चुका होऊ शकतात', अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. भाजपचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' असलेल्या जलयुक्त शिवार योजनेची चौकशी होणार आहे. त्यामुळे भाजपने राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. 'जलयुक्त शिवार योजनेची चौकशी कॅगच्या अहवालानुसारच करण्यात येत आहे. राज्य सरकारने  सुडबुद्धीने कारवाई केली नाही. त्यामुळे विरोधकांनी यामध्ये कोणतेही राजकारण आणू नये. सरकार कुणाचेही असताना चुका होऊ शकतात, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल विचारले असता,  'खडसे यांच्या विषयावर मला बोलायचं नाही' असं सांगून अजितदादांनी बोलण्याचे टाळले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याची मागणी काही मंत्र्यांनी केली होती. ‘कॅग’नेही या योजनेवर ताशेरे ओढले होते त्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने या योजनेच्या  चौकशीचे आदेश दिले आहे. 'पाणी अडवा, पाणी जिरवा, ही घोषणा करत दुष्काळमुक्तीसाठी तत्काली फडणवीस सरकारने ही योजना राबवली होती आणि त्याचा गाजावाजाही खूप झाला होता. जलयुक्त शिवार योजनवर 9 हजार कोटी खर्च झाला, मात्र त्याचा फायदा नाही, असा आरोप होत होता. योजना राबवूनही राज्यात टँकरची संख्या वाढली, भूजल पातळी वाढली नाही, असाही आरोप त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केला होता. जलयुक्त शिवराची योजनमध्ये 6लाख 33 हजार काम झाली त्यावर 9 हजार 700 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. त्यात शास्त्रशुद्ध पद्धतीने कामे केली गेली नाहीत. 700 तक्रारी आल्या आहेत. त्यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता आहे. त्याची चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणाची  चौकशी कशी करायची हे लवकर स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे, सुप्रमा ही मोठ्या प्रमाणावर देण्यात आल्या. या सुप्रमात 200 ते 900 पट वाढ करण्यात आली आहे. याचीही चौकशी केली जाणार आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Devendra Fadnavis

    पुढील बातम्या