मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यात आणखी एक प्रकाशन सोहळा वादात; गुजरातमधील वादग्रस्त एन्काऊंटर पुस्तकाचा विषय

पुण्यात आणखी एक प्रकाशन सोहळा वादात; गुजरातमधील वादग्रस्त एन्काऊंटर पुस्तकाचा विषय

पुण्यात आणखी एक प्रकाशन सोहळा वादात

पुण्यात आणखी एक प्रकाशन सोहळा वादात

पुण्यात आणखी एक पुस्तक प्रकाशन सोहळा वादात सापडला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  Rahul Punde

पुणे, 24 जानेवारी : पुण्यात अलीकडेच मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल पुरोहित यांच्यावरील पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावरुन जोरदार वाद निर्माण झाला होता. आता आणखी एक पुस्तक प्रकाशन सोहळा वादात सापडला आहे. "इशरत जहाँ एन्काऊंटर" हा पुस्तक प्रकाशन सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पुण्यात गंजपेठ येथील सावित्रीबाई फुले स्मारक येथे आज (मंगळवारी) सायंकाळी हा कार्यक्रम होणार होता. त्यासाठी आयोजकांनी महापालिकेचा हॉल देखील बुक केला होता. पण हे पुस्तक सेन्सिटिव्ह असल्याचे कारण देत महापालिका प्रशासनाने ऐनवेळी हॉल रद्द केला आहे.

गुजरातमधील 2004 सालच्या एन्काऊंटर आधारित

मुंब्रा येथील राहणारी इशरत जहाँ (वय वर्ष 21) या मुलीचा तिच्या साथीदारांसोबत गुजरातमध्ये 2004 साली एन्काऊंटर करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा आरोप करीत त्या सर्वांचा एन्काऊंटर झाल्याची घटना जगप्रसिद्ध आहे. यावर आता मुंबईमध्ये राहणारे लेखक अब्दुल वाहिद शेख यांनी पुस्तक लिहिले आहे. इशरत जहाँ प्रकरणावर हे पुस्तक असून याच प्रकाशन आज पुण्यात माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, कायदेतज्ज्ञ असीम यांच्या हस्ते होणार आहे. हे पुस्तक फेक एन्काऊंटरचा भंडाफोड करणारे पुस्तक असून 'इशरत जहाँ एन्काऊंटर' या नावाने हे पुस्तक असल्याचे लेखक अब्दुल वाहिद शेख यांनी म्हटले आहे. 2006 सिरीयल बॉम्बस्फोटाच्या खोट्या केसमध्ये नऊ वर्षे तुरुंगात राहून कोर्टातून निर्दोष सिद्ध झालेले मुंबई येथील पुस्तकाचे लेखक अब्दुल वाहिद शेख यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

वाचा - पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीची जागा सेनेला द्या, थेट अजितदादांकडेच मागणी

वादग्रस्त कार्यक्रमामुळे हॉल रद्द

'या पुस्तकात मी खरी परिस्थिती वापरली आहे. इशरत जहाँ हिला न्याय मिळाला पाहिजे यासाठी मी हे पुस्तक लिहिले आहे. हा पूर्णपणे फेक एन्काऊंटर असल्याने मी हे पुस्तक लिहिले आहे. आता हे पुस्तक उर्दू भाषेत असून लवकरच मराठी आणि हिंदीमध्ये देखील हे पुस्तक येणार आहे', असे यावेळी लेखक वाहिद शेख यांनी म्हटले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यातील सावित्रीबाई फुले स्मारक, गंजपेठ, पुणे येथे होणार आहे. व्यवस्थापकाने भाडे स्वीकारले व तशी हॉल आरक्षित केल्याची भाडे पावती दिली. या प्रकाशन सोहळा बाबत उपस्थित राहणारे माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील, सेवानिवृत्त आयजी एस.एम. मुश्रीफ आणि अन्य वक्त्यांची माहिती खडक पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता यादव यांना समक्ष भेटून देण्यात आली. तसा अर्जही त्यांनी स्वीकारला. पण, अचानक रविवारी सकाळी हॉलची देखरेख करणारे महापालिका कर्मचारी कोडीतकर यांनी तुमचे पुस्तक सेन्सिटिव्ह आहे. पुस्तक प्रकाशनासाठी तुम्हाला दिलेला हॉल तो आम्ही रद्द करीत आहोत. कृपया आपण आपले पैसे घेऊन जावे, असे सांगितले असे यावेळी मूल निवासी मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी सांगितले.

First published:

Tags: Pm modi, Pune