Home /News /pune /

World Record: पुण्याच्या चिमुकलीची दुबईत भन्नाट कामगिरी; जागतिक विक्रम करत 3 रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवलं नाव

World Record: पुण्याच्या चिमुकलीची दुबईत भन्नाट कामगिरी; जागतिक विक्रम करत 3 रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवलं नाव

World Record Pune: पुणे जिल्ह्यातील मंचर येथील एका छोट्याशा गावातील रहिवासी असणाऱ्या चार वर्षाच्या चिमुकलीनं जागतिक विक्रम केला आहे. जगातील तीन प्रमुख रेकॉर्ड बुकनं तिच्या नावाची नोंद केली आहे.

    पुणे, 07 जुलै: पुणे जिल्ह्यातील मंचर (Manchar) येथील एका छोट्याशा गावातील रहिवासी असणाऱ्या चार वर्षाच्या चिमुकलीनं जागतिक विक्रम (World Record) केला आहे. जगातील तीन प्रमुख रेकॉर्ड बुकनं तिच्या नावाची नोंद केली आहे. या चिमुकलीनं अवघ्या तीन मिनिटं दहा सेंकदात 195 देशांचे ध्वज (Flag) पाहून देशाचं नाव आणि राजधानी (Capital) सांगितली आहे. तिनं या अनोख्या कामगिरीनं पुण्याचं आणि महाराष्ट्राचं नाव जागतिक स्तरावर पोहोचवलं आहे. एखादी गोष्टी आत्मसात करण्याच्या तिच्या कौशल्याचं जगभर कौतुक होतं आहे. ईशान्वी बाळासाहेब आढळराव पाटील (Ishanvi Adhalrao Patil) असं जागतिक विक्रम रचणाऱ्या चिमुकलीचं नाव असून ती मंचर येथील चिंचोडी देशपांडे येथील रहिवासी आहे. अवघ्या चार वर्षे अकरा महिने वय असणाऱ्या एका चिमुरडीनं हे अभूतपूर्व कामगिरी केली आहे. 15 जून रोजी दुबईत ही जागतिक स्पर्धा पार पडली होती. या स्पर्धेत ईशान्वीनं तब्बल 195 देशांचे ध्वज पाहून देशाचं आणि राजधानीचं नाव अवघ्या 3 मिनिटे 10 सेकंदात सांगण्याचा जागतिक विक्रम केला आहे. इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड या तीन रेकॉर्ड बुकमध्ये तिचा हा विक्रम नोंदला गेला आहे. इशान्वीची जिद्द, चिकाटी आणि आत्मसात करण्याची क्षमता अफलातून आहे. तिच्या या कौशल्याचं अनेक स्तरातून कौतुक केलं जात आहे. तिच्या या विक्रमानं आंबेगाव तालुका आणि महाराष्ट्राची मान अभिमानानं उंचावल्याची भावना गावकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. अत्यंत लहान वयात तिने डोंगराएवढी कामगिरी केल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया इशान्वीची आई नीता आढळराव पाटील यांनी व्यक्त केली आहे. हेही वाचा-World Record: 5 वर्षांच्या चिमुरडीनं बनवला विश्वविक्रम; 105 मिनिटांत वाचली तब्बल 36 पुस्तकं अगदी मोठ्या पदावर कार्यरत असणाऱ्या सुशिक्षित लोकांना देखील देशांचे केवळ ध्वज पाहून त्या देशांची नावं आणि राजधानी सांगता येणार नाही. पण मंचरच्या या चिमुकलीनं तब्बल 195 देशांचे ध्वज पाहून देशाचं आणि राजधानीचं नाव सांगितलं आहे. खरंतर, जगातील बऱ्याच देशांचे ध्वज हे दिसायला एकसारखे दिसतात. त्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता अधिक असते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pune, World record

    पुढील बातम्या