नवी दिल्ली, 11 एप्रिल: जगभरात असे अनेक लोकं असतात, ज्याची हुशारी पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं. त्यातला त्यात अशा व्यक्तीचं वय कमी असेल तर चर्चा होतेचं. जगात असे अनेक मुलं आहेत, जे अगदी लहान वयातच नृत्य, गाणं, खेळ, अभ्यास किंवा इतर कोणत्याही अॅक्टीव्हिटीमध्ये अत्यंत हुशार असतात. 5 वर्षांची चिमुरडी कियारा कौर (Kiara Kaur) अशीच एक मुलगी आहे, जिने वयाच्या पाचव्या वर्षीच जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे.
पाच वर्षांची कियारा कौर भारतीय अमेरिकन (Indian- American) वंशाची आहे. सध्या ती संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) राहते. तिला वाचनाची प्रचंड आवड आहे. तिने अवघ्या 105 मिनिटांत तब्बल 36 पुस्तकं वाचली (Read 36 books in 105 munute) आहेत. तिच्या या कर्तृत्वाची दखल लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असून वेगात सर्वाधिक पुस्तकं वाचण्याचा जागतिक विक्रम तिच्या नावे नोंदला गेला आहे.
एवढंच नव्हे तर लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डनं कियारा कौरचं नाव 'वंडर चाईल्ड' असं ठेवलं आहे. 13 फेब्रुवारी रोजी तिने सलग 105 मिनिटं वाचन केलं असून दरम्यानच्या काळात तिने 36 पुस्तकं वाचण्याचा विश्वविक्रम केला आहे. त्यावेळी तिचं वय अवघं 4 वर्ष एवढं होतं. त्याचबरोबर एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनं म्हटलं की, ती सलग सर्वाधिक पुस्तकं वाचणारी मुलगी आहे.
(हे वाचा- शाळा सोडून केली 8 हजाराची नोकरी, आता आहेत देशातील सर्वात युवा अब्जाधीश)
खरंतर कियाराला सुरुवातीपासूनच पुस्तकं वाचण्याची प्रचंड आवड आहे. ती अबू धाबी याठिकाणी नर्सरीच्या वर्गात शिकत असताना तिच्या एका शिक्षकानं तिची प्रतिभा ओळखली. पण कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद झाली. त्यामुळे कियारालाही घरी बसावं लागलं आहे. तिला पुस्तकं वाचायला खूप आवडतं असं कियाराच्या पालकांनी सांगितलं आहे. गेल्या एका वर्षात तिनं तब्बल 200 पुस्तकं वाचली आहेत. कियाराचे पालक मुळचे चेन्नईचे रहिवाशी आहेत. तर कियाराचा जन्म अमेरिकेत झाला होता. तर मोठं होऊन तिला डॉक्टर बनायचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: World record