पुणेकरांनो 7च्या आत घरात व्हा! पोलीस आयुक्तांनी दिले कारवाईचे नवे आदेश

पुणेकरांनो 7च्या आत घरात व्हा! पोलीस आयुक्तांनी दिले कारवाईचे नवे आदेश

एककीकडे पिंपरी चिंचवड शहर रेड झोनमधून बाहेर आल्याने नियम शिथिल करण्यात आले आहेत तर दुसरीकडे पुणेकरांनी कठोर नियम पुणे पोलीस आयुक्तालयांकडून लागू करण्यात आले आहेत.

  • Share this:

पुणे, 22 मे : राज्यात कोरोना दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशात सगळ्यात आधी पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण होते. आताही पुण्यात कोरोनाचा शिरकाव वाढत चालला आहे. एककीकडे पिंपरी चिंचवड शहर रेड झोनमधून बाहेर आल्याने नियम शिथिल करण्यात आले आहेत तर दुसरीकडे पुणेकरांसाठी कठोर नियम पुणे पोलीस आयुक्तालयांकडून लागू करण्यात आले आहेत.

पुणेकरांनी सातच्या आत घरात येण्याचा आदेश देण्यात आला आहे. पुण्यात 31 मे पर्यंत राञी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी कायम असणार आहे. त्यामुळे कोणीही यावेळी घराच्या बाहेर पडणार नसल्याचे आदेश देण्यात आले आहेत. राञी सात ते सकाळी सातपर्यंत वाहन घेऊन बाहेर पडल्यास कलम 188 अनुसार कारवाई होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. पुणे सहपोलीस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी हे 'नाईट संचारबंदी'चे नवे आदेश काढले आहेत.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात काल दिवसभरात 265 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात एकूण 4809 इतकी कोरोना बाधितांची संख्या झाली असून एकूण 242 जण मृत्यूमुखी पडले आहेत. दरम्यान ससून रुग्णलयात एका कोरोना बाधित रुग्णावर प्लाझ्मा शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. नायडू रुग्णालयातील बऱ्या झालेल्या रुग्णाच्या अँटी बॉडीज ससून रुग्णालयातील गंभीर रुग्णाला प्लाझ्मा थेरपी मार्फत देण्यात आल्या. या रुग्णाची प्रकृती आता सुधारत आहे.

अखेर पिंपरी चिंचवडकरांनी जिंकली लढाई, आजपासून असणार नवीन नियम

पुण्यातील रस्त्यावरच्या वाहतुकीवर आता पोलीस नियंत्रण ठेवणार नाहीत. पोलीस गुन्हे अन्वेशनाच्या कामात वर्ग करण्याचा निर्णय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे सुरुवातीला पोलिसांच्या काठीच्या भितीने बाहेर पडायला बिचकणारे पुणेकर व्यवहार्य गरजांसाठी पूर्ण काळजी घेऊन बाहेर पडतील अशी आशा करायला हरकत नाही.

दरम्यान, व्यवहार सुरळीत करण्यासाठी सरकारने प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात दुकानांना परवानगी दिली आहे. पुण्यात अनेक भागात दुकानेही सुरू झाली आहेत. मात्र भीतीपोटी नागरीक अजुनही बाहेर पडायला धजावत नाही, असेच दिसून येत आहे. ज्या व्यवसाय आणि दुकानांना परवानगी दिलीय त्याची वेळ सकाळी 9 ते 5 राहणार असून रात्री 7 ते सकाळी 7 या वेळात संचारबंदी लागूच असणार आहे. मात्र असं असलं तरी बाजारपेठेत गर्दी नाही.

'रोज रात्री आम्हाला घेऊन  जातात आणि डीआयजी साहेबांना खूश करायला सांगतात'

संपादन - रेणुका धायबर

First published: May 22, 2020, 8:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading