Home /News /news /

'रोज रात्री आम्हाला घेऊन  जातात आणि डीआयजी साहेबांना खूश करायला सांगतात'

'रोज रात्री आम्हाला घेऊन  जातात आणि डीआयजी साहेबांना खूश करायला सांगतात'

तुरूंगील कैदी महिलांना जबरदस्ती अधिकाऱ्यांना खूश करण्यासाठी भाग पाडलं जातं असं या महिलेने माध्यमांना सांगितलं आहे.

    लाहोर(पाकिस्‍तान ), 21 मे : महिला अत्याचाराच्या अनेक धक्कादायक घटना आपण पाहिल्या असतील. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने खळबळजनक खुलासा केला आहे. कारागृहात महिलांवर लैंगिक छळ (Sexual Harassment) सुरू असल्याचं एका महिलेनं म्हटलं आहे. तुरूंगील कैदी महिलांना जबरदस्ती अधिकाऱ्यांना खूश करण्यासाठी भाग पाडलं जातं असं या महिलेने माध्यमांना सांगितलं आहे. या बातमीमुळे एकच खळबळ उडाली आहे. 'आम्हाला रात्री घेऊन जातात आणि सांगतात की डीआजी साहेबाला खूश करायचं आहे' 2-3 दिवसात काऊंटरवर करता येणार स्पेशल रेल्वेसाठी तिकीट बुकिंग-रेल्वे मंत्री ‘डेली पाकिस्तान’ च्या वृत्तानुसार या महिलेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. यात महिलेने आपला चेहरा झाकला असून ओळख लपवली आहे. महिलेने सांगितलं की, ती लाहोर जिल्हा कारागृहात तुरूंगात आहे. आमच्यावर बरेच अत्याचार होत असल्याचा आरोप तिने केला आहे. आमचा छळ होतो. आम्हाला रात्री घेऊन जातात आणि म्हणतात की डीआयजी साहेबाला खूश करायचं आहे. माझ्याखेरीज इतरही बर्‍याच स्त्रिया आहेत. ज्यांना तिथे नेण्यात आलं आहे आणि नंतर त्यांना एकमेकांसोबत बदली केलं जातं. यानंतर आम्हा खूप वाईट गोष्टी करायला सांगतात असं या महिलेनं म्हटलं आहे. यात बऱ्याच अधिकाऱ्यांची मिलीभगत आहे. या सर्व अधिकाऱ्यांची माहितीही डीआयजीला आहे. ती पुढे म्हणते की, एकदा महिला गर्भवती झाली तर तिचा गर्भपात केला होता. आम्ही सर्व महिलांनी पंतप्रधान इम्रान खान यांना जेलमध्ये येऊन आमची प्रकृती पहावी असं आवाहन केलं आहे. प्लीज आम्हाला मदत करा असंही तिने म्हटलं आहे. पुढचे 7 दिवस मुंबईत 'असं' असणार हवामान, या भागांत पावसाची शक्यता प्रत्येक देशात महिलांवर अत्याचाराच्या घटना समोर येत असतात. पण आता तुरुंगातही महिला सुरक्षित नाही. भारतातही प्रत्येक क्षेत्रात महिला अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. त्यावर अद्यापही कोणतीही ठोस पाऊलं उचलण्यात आलेली नाही. त्यामुळे पुढारलेल्या विचारांचा देश असं आपण किती दिवस म्हणायचं असा प्रश्न आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Sexual harassment

    पुढील बातम्या