पुणे 17 जून: पुण्यात कोरोना कंटेंटमेट झोनची फेररचना जाहीर झाली असून पुण्यात आता 73 कंटेंटमेंट झोन जाहीर असतील. शहरात यापूर्वी 66 कंटेंटमेट झोन होतेपूर्वीच्या 66 पैकी 24 वगळले तर 32 नव्याने वाढले तर 11 कंटेंटमेट झोनची फेररचना केली गेलीय. पुणे मनपाचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी न्यूज18 लोकमतला ही माहिती दिली. शहराच्या आता सर्वच भागात हे कोरोना बाधित झोन असणार आहेत. शहरातली 5 हजार दुकाने खुली झाली आहेत. गर्दी वाढणार असल्याने धोकाही वाढला असून नागरिकांनी नियमांचं सक्तीने पालन करावं असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. शिवाजीनगर, एरंडवना, औंध परिसरातही कोरोना प्रतिबंधित झोनची वाढ झालीय. हे नवे कोरोना बाधित मायक्रोझोन्स जाहीर करताना मुख्य रस्त्यावरील व्यापारी संकुलेच वगळून टाकल्याने पेठांमधील दुकाने उघडण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला असून आज शहराच्या मध्यवर्ती पेठांमधील अंदाचे पाच हजार दुकाने तब्बल तीन महिन्यांनंतर खुली झालीत आहेत. ही शहराची मध्यवर्ती भागातील सिझनल घाऊक बाजारपेठ समजली जाते. नव्या कोरोना मायक्रोझोनिंग पॉलिसीनुसार यापुढे फक्त पेशंट्स सापडलेल्या निवासी सोसायट्याच सील होणार आहेत. पुणेकरांना दिलेली सूट उद्यापासून घेणार मागे, महापौरांनी घेतला मोठा निर्णय त्यामुळे प्रतिबंधित क्षेञं 73वर जाऊनही कोरोना प्रतिबंधित क्षेञफळ 3 टक्क्यांवरून 2 टक्क्यांवर घसरले आहे तर पुण्यातील रूग्णसंख्या 10 हजारांवर पोहचूनही शहराचं 98 टक्के क्षेञफळ खुले राहणार आहे. पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांची ‘न्यूज18 लोकमत’ला माहिती अनलॉक नंतर गर्दी वाढल्याने पुण्याला हादरे बसत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये शहरात तब्बल 460 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातली एकूण संख्या 10 हजारांच्या वर गेली आहे. तर दिवसभरात 117 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. पुण्यात आज 12 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 481 जणांचा मृत्यू झाला आहे. 232 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 44 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 10643 वर गेली आहे. काँग्रेसचा भाजपला जोरदार धक्का! या राज्यात सरकार संकटात राज्यात आजही कोरोना रुग्णांच्या संख्येत धक्कादाय वाढ झाली आहे. आजही 3307 रुग्णांची नव्याने भर पडली. त्यामुळे एकूण संख्या 1 लाख 16 हजारांवर गेली आहे. तर आज 114 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या 5651वर गेली आहे. मुंबईत आज 77 जणांचा मृत्यू झाला. तर आज 1315 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. संपादन - अजय कौटिकवार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.