पुणेकरांना दिलेली सूट उद्यापासून घेणार मागे, महापौरांनी घेतला मोठा निर्णय

पुणेकरांना दिलेली सूट उद्यापासून घेणार मागे, महापौरांनी घेतला मोठा निर्णय

लॉकडाऊन Unlock च्या माध्यमातून 33 उद्यानं सुरू केली होती. पण कोरोनाच्या रुग्णांचा दिवसेंदिवस वाढत जाणारा आकडा चिंताजनक असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • Share this:

पुणे, 17 जून : पुण्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे सुरू केलेली उद्यानं उद्यापासून बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय महापौरांच्या सुचनेनंतर घेण्यात आला आहे. लॉकडाऊन Unlock च्या माध्यमातून 33 उद्यानं सुरू केली होती. पण कोरोनाच्या रुग्णांचा दिवसेंदिवस वाढत जाणारा आकडा चिंताजनक असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, पुण्यात गेल्या 24 तासांत कोरोना सर्वाधिक 460 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. दिवसभरात 117 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 12 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून आलेल्या आकडेवारीनुसार, 232 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 44 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 10643 इतकी आहे. आतापर्यंत 481 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण 6713 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

उद्याने बंद करण्याचा निर्णय घेण्याची 5 प्रमुख कारणं...

1) ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची प्रतिकार क्षमता कमी असते. उद्यानातील लहान मुलांची खेळण्याची साधने अथवा ज्येष्ठ नागरिकांची व्यायामाची साधने लोखंडी असल्याने संसर्गाचा धोका वाढू शकतो.

2) मास्क घालून व्यायाम करू नये, असे डॉक्टर सांगतात. त्यामुळे उद्यानात मास्क घालून व्यायाम करणे फायद्याचे ठरणार नाही.

3) उद्याने सुरू झाल्यानंतर, आज कोरोना कामासाठी लावलेली उद्यान विभागाची यंत्रणा काढून सुरक्षारक्षक, माळी काम करणारे इ. परत उद्यानात कामाला आणावे लागेल, त्यामुळे यंत्रणेवर ताण वाढेल.

4) उद्यान सुरू झाल्यानंतर भेळ, पाणीपुरी इ. हातगाड्या बाहेर लागतील, त्यामुळे अतिक्रमण खात्यातील मनुष्यबळ जे कोरोनासाठी लावलेल्या यंत्रणेवर ताण पडेल.

5) अत्यावश्यक गरज नसताना उद्यान चालू करणे म्हणजे संसर्गाला आमंत्रण देणे, रोगाचा प्रसार वाढणे. त्यामुळे त्याचा फार मोठा तोटा होवू शकतो. तसेच कोरोना यंत्रणेत मनुष्यबळ आधीच कमी आहे, आणि त्यामुळे यंत्रणेवर ताण वाढेल.

त्यामुळे उद्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या फिरण्यासाठी टेकडी, मैदाने खुले आहेत, त्यामुळे उद्यान सुरू करण्याचा निर्णय समाजाच्या हिताचा नाही, भविष्य काळात त्याचा विचार करू असं महापौरांकडून सांगण्यात आलं आहे.

संपादन - रेणुका धायबर

First published: June 17, 2020, 10:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading