लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी
नाशिक, 28 ऑक्टोबर : नाशिक (Nashik) पुन्हा एकदा बलात्काराच्या (Rape) घटनेने हादरलं आहे. नाशिकमधील वणी येथे एका 42 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार (Woman gang raped in Vani Nashik) झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. वणी येथील एसटी बस स्टॅण्ड (Vani Bus stand) परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित महिला बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आपल्या मित्रासोबत बस स्थानकात बसली होती. त्यावेळी तेथे आलोल्या चौघांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. जीवे मारण्याची धमकी देत या महिलेवर आरोपींनी बलात्कार केला असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी या प्रकरणी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. चारही संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. वणी परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
नाशकात अल्पवयीन मुलीचा विनयभंग
नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी विनयभंगाची घटना घडल्याचं समोर आलं होतं. अल्पवयीन मुलीला बळजबरीनं लॉजवर नेऊन विनयभंग केला. नाशिकच्या अशोका मार्ग परिसरातली ही घटना आहे. शाळेत जाणाऱ्या मुलीला तुला तुझ्या पप्पांनी घरी बोलावलं असं सांगून आरोपीनं कारमध्ये बसवलं. मुलगी कारमध्ये बसल्यानंतर आरोपीनं कार लॉजवर नेली आणि तिथं तिच्यावर अतिप्रसंग केला.
पीडित मुलीनं घरी आल्यावर घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संतापलेल्या पीडित मुलीच्या नातेवाईकांनी आरोपी दानिश खानला मारहाण केली आहे. सध्या आरोपी दानिशवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
तोंडात बोळा कोंबून व्यावसायिक महिलेवर अत्याचार
नाशकात काही दिवसांपूर्वी एका व्यावसायिक महिलेवर नराधमाने तोंडात बोळा कोंबून आणि तिचे हात बांधून अत्याचार केला आहे. नराधम आरोपी हा सराईत गुन्हेगार असून नाशिक पोलीस त्याचा शोध घेत आहेत. संबंधित संतापजनक घटना नाशिक शहरातील पवननगर भागात घडली आहे. पीडित महिलेचा ब्युटीपार्लरचा व्यवसाय असून सराईत गुन्हेगारानं चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला आहे. पीडित महिला आपल्या पार्लरमध्ये देवाची पूजा करीत असताना, संशयित आरोपी तिच्या दुकानात शिरला. यानंतर आरोपीनं पार्लरचा दरवाजा आतून बंद करून चाकूचा धाक दाखवत तिच्यासोबत जबरदस्ती केली आहे. नराधमाने पीडित महिलेच्या तोंडात बोळा कोंबून तिचे हात बांधत अमानुष पद्धतीने तिच्यावर अत्याचार केला आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.