जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / ICC World Cup : श्वास रोखून धरणारा थरारक सामना पुण्यात, रोहित सेना 'या' टीमशी भिडणार

ICC World Cup : श्वास रोखून धरणारा थरारक सामना पुण्यात, रोहित सेना 'या' टीमशी भिडणार

ICC World Cup : श्वास रोखून धरणारा थरारक सामना पुण्यात, रोहित सेना 'या' टीमशी भिडणार

आयसीसी वन-डे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा हा सामना पुण्यात होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 27 जून : 2023 च्या सुरुवातीपासूनच क्रिकेट फॅन्सचं लक्ष लागलेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2023 चं वेळापत्रक अखेर जाहीर झालंय. या वर्ल्डकपमध्ये महाराष्ट्रीतील मुंबई आणि पुण्यात सामने होणार आहेत. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील स्टेडियमवर या वर्ल्ड कपच्या 5 मॅच होणार आहेत. पुणेकरांसाठी विशेष आनंदाची बातमी म्हणजे टीम इंडियाची एक मॅच देखील पुण्यात होतीय. भारत विरुद्ध बांगलादेश हा वर्ल्ड कपमधील सामना पुण्यात खेळला जाणार आहे. गुरुवार 19 ऑक्टोबर रोजी हा सामना खेळला जातोय. दर चार वर्षांनी होणाऱ्या वन-डे वर्ल्ड कपमधील प्रत्येक सामना हा महत्त्वाचा असतो. भारत आणि बांगलादेश यांच्यात वर्ल्ड कपमधील सामने हे रंगतदार झालेत. 2007 साली वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशनं टीम इंडियाचा धक्कादायक पराभव केला होता. या पराभवामुळे भारतीय टीमचं वर्ल्ड कपमधील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं होतं.

News18लोकमत
News18लोकमत

पुण्यात यापूर्वी 1996 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये केनिया विरुद्ध वेस्ट इंडिज हा सामना झाला होता. त्या सामन्यात केनियानं वेस्ट इंडिजचा धक्कादायक पराभव केला होता. पण, गहुंजेमध्ये झालेल्या स्टेडियममध्ये पहिल्यांदाच वर्ल्ड कपचा सामना होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशला कमी लेखण्याची चूक टीम इंडिया करणार नाही. त्यामुळे टीम इंडियाचा सरस खेळ पाहण्याची संधी पुणेकरांना येत्या 19 ऑक्टोबर रोजी मिळणार आहे. ICC World Cup : मौका मौका! भारत पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, वनडे वर्ल्ड कपच वेळापत्रक जाहीर पुण्यातील सामने भारत विरुद्ध बांगलादेश – 19 ऑक्टोबर अफगाणिस्तान विरुद्ध क्वालिफायर 2 – 30 ऑक्टोबर न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका – 1 नोव्हेंबर इंग्लंड विरुद्ध क्वालिफायर 1 – 8 नोव्हेंबर ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश – 12 नोव्हेंबर भारताचे सामने 8 ऑक्टोबर - विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई 11 ऑक्टोबर - विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली 15 ऑक्टोबर - विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद 19 ऑक्टोबर - विरुद्ध बांगलादेश, पुणे 22 ऑक्टोबर - विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाळा 29 ऑक्टोबर - विरुद्ध इंग्लंड, लखनऊ 2 नोव्हेंबर - विरुद्ध क्वालिफायर 2, मुंबई 5 नोव्हेंबर - विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता 1 नोव्हेंबर - विरुद्ध क्वालिफायर 1, बंगळुरू

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात