जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / अजून मी मेली नाय! अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच आजीनं उघडले डोळे, बारामतीतील घटना

अजून मी मेली नाय! अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच आजीनं उघडले डोळे, बारामतीतील घटना

अजून मी मेली नाय! अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच आजीनं उघडले डोळे, बारामतीतील घटना

Baramati News: कोरोनाबाधित आजीचं निधन झाल्याचं समजून नातेवाईक अंत्यसंस्काराची तयारी करत होते. दरम्यान आजीनं डोळे उघडताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

बारामती, 12 मे: सध्या राज्यात कोरोना बाधितांची सख्या झपाट्यानं (Corona cases in Maharashtra) वाढत आहे. वैद्यकीय सुविधा मिळत नसल्यानं अनेकांना आपला जीव गमवावा (Corona patients death) लागत आहे. अशातचं जीवंत रुग्णांना मृत घोषित करण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. मंगळवारी बीकानेर याठिकाणी एका 70 वर्षीय वृद्धाला डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर दीड तासांनी संबंधित वृद्ध जीवंत असल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाचं बारामतीतही याठिकाणीही अशीच विचित्र घटना समोर आली आहे. बारामती तालुक्यातील मुढाळे गावातील 76 वर्षीय आजीला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे तिला घरातचं विलगीकरणात ठेवून उपचार केले जात होते. पण वयोमान जास्त असल्यानं प्रकृतीत सुधारणा व्हायला अनेक अडचणी निर्माण होतं होत्या. त्यामुळे संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांच्या चिंता दिवसेंदिवस वाढत होत्या. अशा अवस्थेतही घरातील मायेचा आधार जगला पाहिजे, म्हणून घरातील सर्व सदस्य कोरोना नियमांच पालन करत तिची सेवा करत होते. दैनिक पुढारी नं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित आजीची मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडत चालली होती. त्यामुळे पुढील उपचारासाठी बारामती याठिकाणी घेऊन जाण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. आजीला बारामती याठिकाणी घेऊन जात असतानाच, आजींच्या हालचाली बंद झाल्या. बराच प्रयत्न करूनही त्यांच्या शरीरात काहीही हालचाली दिसल्या नाहीत. त्यामुळे आजीचं निधन झालं असल्याचं कुटुंबीयांना वाटलं. त्यामुळे त्यांनी रस्त्यातूनचं माघारी गाडी वळवली. हे वाचा- डॉक्टरांनी कोरोना रुग्ण वृद्धाला मृत घोषित केलं, दीड तास मुलीने फोडला टाहो अन् त्यानंतर घडला चमत्कार कुटुंबीयांनी अंत्यसंस्कारासाठी फोन करून आपल्या जवळच्या नातेवाईकांनाही बोलावलं. अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. अनेकांनी रडून रडून हंबरडा फोडला. त्यानंतर अचानक आजीनं डोळे उघडल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. आजी जीवंत असल्याचं कळताच अनेकांच्या दुःखाच्या अश्रूंच रुपांतर आनंदाश्रूत झालं. त्यानंतर पाहुण्यांना फोन करून आजी अजून जीवंत असल्याचा निरोप देण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात