मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

लेकरांना सकाळी जाग आली अन् आई-वडील आढळले मृतावस्थेत; 13 वर्षांचा संसार क्षणात उद्धवस्त

लेकरांना सकाळी जाग आली अन् आई-वडील आढळले मृतावस्थेत; 13 वर्षांचा संसार क्षणात उद्धवस्त

Crime in Pune: लग्नाला तेरा वर्षे होईपर्यंत संसाराचा गाडा सुरळीत चालू होता. पण मनात संशयाची पाल चुकचुकल्याने एका क्षणात तेरा वर्षाचा संसार उद्धवस्त झाला आहे.

पुणे, 02 जून: लग्नाला तेरा वर्षे होईपर्यंत संसाराचा गाडा सुरळीत चालू होता. पण मनात संशयाची पाल चुकचुकल्याने एका क्षणात तेरा वर्षाचा संसार उद्धवस्त झाला आहे. मंगळवारी रात्री घरातील सर्वजण जेवण करून शांत झोपले होते. त्यावेळी पतीने चारित्र्याच्या संशयातून आपल्या पत्नीची ओढणीने गळा आवळून हत्या (husband strangled wife to death) केली. त्यानंतर पतीनेही गळफास घेऊन स्वतःला संपवलं (Husband commits suicide) आहे. पण या घटनेबाबत नामानिराळी असलेली लेकरं सकाळी उठल्यानंतर आई वडिलांना मृतावस्थेत पाहून त्यांनी टाहोचं फोडला आहे. सकाळी मुलांचा रडण्याचा आवाज ऐकून शेजारील लोकांनी घरी धाव घेतली. तेव्हा दोघंही पती पत्नी मृतावस्थेत आढळले आहे. या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचानामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. संबंधित हत्या झालेल्या महिलेचं नाव उषा योगेश गायकवाड असून आरोपी मृत पतीचं नाव योगेश गायकवाड असं आहे. या दोघांचं तेरा वर्षापूर्वी लग्न झालं होतं. काही दिवस सुखात गेल्यानंतर मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. मृत दाम्पत्य योगेश आणि उषा पुण्यातील चंदन नगर परिसरात आपल्या मुलांसोबत वास्तव्याला होती. मागील दोन वर्षापासून योगेश बेरोजगार होता. त्याच्या हाताला काही काम नसल्याने मृत पत्नी उषा घरकाम करून संसाराचा गाडा हाकलत होती. बाहेर घरकामासाठी जाणाऱ्या पत्नीवर योगेश सतत संशय घेत होता. त्यातून त्यांच्यामध्ये अनेकदा जोरदार भांडणंही झाली होती. पण काल रात्री घरातले सर्वजण शांत झोपल्यानंतर, योगेशने पत्नी उषाचा ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हे ही वाचा-Dhule Crime: पत्नी फोनवर बोलत असल्याचं पाहून पतीला आला राग; ब्लेडने सपासप वार सकाळी मुलांनी आरडाओरड केल्यानंतर सर्व प्रकार समोर आला आहे. या घटनेची माहिती शेजारच्यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना पाचारण केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून चंदन नगर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Crime news, Pune, Wife and husband

पुढील बातम्या