धुळे, 02 जून: फोनवर जास्त वेळ बोलल्यामुळे धुळ्यातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर ब्लेडने जीवघेणा हल्ला (Blade attack on wife) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात पत्नी गंभीर जखमी झाल्याचं पाहून आरोपी नवऱ्यानेही विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. आसपासच्या लोकांनी दोघांनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. याठिकाणी दोघांवर उपचार सुरू असून पत्नीची प्रकृती नाजूक आहे. संबंधित घटना धुळे जिल्ह्यातील आर्वी याठिकाणी घडली आहे. काजल वसंत सोनवणे असं ब्लेड हल्ला झालेल्या विवाहित महिलेचं नाव असून वसंत सक्राम सोनवणे असं हल्ला करणाऱ्या पतीचं नाव आहे. सोमवारी सकाळी पत्नी काजल बराच वेळ फोनवर बोलत बसली होती. पत्नीने जास्त वेळ फोनवर बोलल्याने (Husband gets angry on wife for talking too much on phone) दोघांमध्ये वाद झाला. याच रागातून आरोपी पती वसंतने काजलवर ब्लेडने सपासप वार केले. या ब्लेड हल्ल्यात काजलला गंभीर दुखापत झाली. हे ही वाचा- सराफा खून प्रकरण: ही कितवी बायको आहे? एका प्रश्नानं उलगडलं दुसऱ्या हत्येचं रहस्य काजलला गंभीर दुखापत झाल्यानंतर घाबरलेल्या आरोपी पतीनेही विषारी औषध पिऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेची माहिती मिळताच शेजाoरी राहणाऱ्या लोकांनी दोघा पती पत्नीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. याठिकाणी दोघांवर उपचार सुरू असून पत्नीची स्थिती चिंताजनक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.