संत तुकारामांचं देहू हादरलं, चारित्र्याच्या संशयावरून पतीनं केली पत्नीची निर्घृण हत्या

संत तुकारामांचं देहू हादरलं, चारित्र्याच्या संशयावरून पतीनं केली पत्नीची निर्घृण हत्या

रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आबेदा ही नेहमीप्रमाणे खासगी कंपनीमध्ये कामासाठी जाण्यास निघाली होती.

  • Share this:

अंनिस शेख (प्रतिनिधी),

मावळ, 5 जुलै: चारित्र्यावर संशय घेणार्‍या पतीने पत्नीवर धारदार कोयत्यानं सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देहूरोड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील साई नगरात रविवारी सकाळी ही घटना घडली आहे.

पतीनं केलेल्या हल्ल्यात 32 वर्षीय आबेदा शेख या महिलेचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला आहे तर हल्लेखोर पती घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा...मुंबई हादरली! वाढदिवसाच्या बहाण्याने चार नराधमांकडून 44 वर्षीय महिलेवर गँगरेप

मिळालेली माहिती अशी की, रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आबेदा ही नेहमीप्रमाणे खासगी कंपनीमध्ये कामासाठी जाण्यास निघाली होती. पती करीम तिचा पाठलाग करत होता. आबेदा अर्ध्या वाटेत आली असता तिच्या पतीनं त्याच्या सोबत आणलेल्या धारदार कोयत्यानं आबेदा हिच्या डोक्यावर आणि हातावर पाच ते सात सपासप वार केले. पत्नीवर हल्ला करून आरोपी पती घटनास्थळावरून पसार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आबेदा हिला काही स्थानिक नागरिकांनी उपचाराकरिता देहूरोड येथील आधार रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचार सुरू असताना अतिरक्तस्त्राव झाल्याने आबेदा हिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं.

हेही वाचा...भाजप ज्येष्ठ नेत्याच्या रथाचा सारथी अत्यवस्थ, मदतीला धावला राष्ट्रवादीचा नेता!

आबेदा हिचा पती करीम तिच्या चारित्र्यावर कायम संशय घेत होता. यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण होत होतं. याच संशयावरून झालेल्या वादातून अखेर करीम यानं आबेदाचा खून असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

First published: July 5, 2020, 2:25 PM IST

ताज्या बातम्या