भाजप ज्येष्ठ नेत्याच्या रथाचा सारथी अत्यवस्थ, मदतीला धावला राष्ट्रवादीचा नेता!

भाजप ज्येष्ठ नेत्याच्या रथाचा सारथी अत्यवस्थ, मदतीला धावला राष्ट्रवादीचा नेता!

धक्कादायक म्हणजे सलीनभाई यांना शास्त्री नगर रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर हातात धरून खुर्चीवर बसून रहावं लागलं.

  • Share this:

कल्याण, 5 जुलै: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या रथ यात्रेतील त्यांच्या रथाचे सारथी सलीम मखानी यांच्या मदतीला राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड धावून आले. सलीम मखानी यांची प्रकृती अत्यवस्थ आहे.

हेही वाचा...धक्कादायक! गेल्या 24 तासांत 3 अधिकाऱ्यांसह 30 पोलिसांना कोरोना, 4 जणांचा मृत्यू

सलीम मखानी यांच्या फुप्फुसांना इन्फेक्शन झालं आहे. डोंबिवली शास्त्री नगर रुग्णालयात सलीम मखानी यांना शुक्रवारी (4 जुलै) दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयत बेड उपलब्ध नसल्यानं त्यांना काही काळ खोळंबून रहावं लागलं. अनेक प्रयत्न करुनही त्यांना बेड मिळाला नाही. धक्कादायक म्हणजे सलीनभाई यांना शास्त्री नगर रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर हातात धरून खुर्चीवर बसून रहावं लागलं.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना याबाबत रात्री माहिती मिळाली. वेळेचं गांभीर्य ओळखून घेऊन त्यांनी तातडीने बेड मिळवून दिला. एवढंच नाही तर या शिवाय दोन महागडी इंजेक्शन्स पाठवून दिली. एक 40 हजार किमतीचे आहे. अशी दोन इंजेकशन्स जितेंद्र आव्हाड यांनी रात्री अडीच वाजता सलीमभाई यांच्यासाठी मोफत पाठवली. तसंच अजून लागली तर सांगा असंही सांगितलं.

हेही वाचा...मुंबई हादरली! वाढदिवसाच्या बहाण्याने चार नराधमांकडून 44 वर्षीय महिलेवर गँगरेप

सलीम मखानी आता भायखळा येथील मदिना रुग्णालयात आहेत. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, सलीम मखानी हे लालकृष्ण अडवाणी यांच्या रथ यात्रेत त्यांच्या रथाचे सारथी होते. सलीम मखानी यांचे सर्व राजकीय मंडळींशी जवळचे संबंध आहेत. मात्र, तरी देखील सलीम भाई यांची ही अवस्था असेल तर सर्वसामान्य नागरिकांचं काय? असा प्रश्न डोंबिवलीकरांना पडला आहे.

First published: July 5, 2020, 1:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading