जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / मूर्खपणाची हद्द, कोरोना होईल असं सांगत पुण्यात सोसायटीने बंद पाडलं हॉस्पिटल

मूर्खपणाची हद्द, कोरोना होईल असं सांगत पुण्यात सोसायटीने बंद पाडलं हॉस्पिटल

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत महापौरांनी मात्र धक्कादायक खुलासा केला आहे. आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त कोरोना झालेल्या रूग्णांचा मृत्यू रेकॉर्डवरच आला नसल्याची माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मांडली आहे.

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत महापौरांनी मात्र धक्कादायक खुलासा केला आहे. आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त कोरोना झालेल्या रूग्णांचा मृत्यू रेकॉर्डवरच आला नसल्याची माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मांडली आहे.

अशा सोसायट्यांवर सरकारने तातडीने कारवाई करावी अशी मागणी डॉक्टरांच्या संघटनेने केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे 11 एप्रिल : कोरोनाविरुद्ध डॉक्टर्स आपला जीव धोक्यात घालून लढत आहेत. त्यांचं कौतुकही होतंय. पण अनेक ठिकाणी डॉक्टरांना त्रास दिला जात आहे. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. मुर्खपणाची हद्द ओलांडत एका सोसायटीने चक्क एक हॉस्पिटलच बंद पाडलंय. पुणे सातारा रोडवर शंकर महाराज मठाजवळ असेलल्या एका सोसायटीने हा प्रताप केला आहे. डॉ. अविनाश भोंडवे यांनी ही माहिती त्यांच्या फेसबुक अकाउंटवर दिली आहे. राजधानी अपार्टमेंट या सोसायटीमध्ये एका ऑर्थोपॅडिक डॉक्टरांचे हॉस्पिटल आहे. मात्र तुच्याकडे येणाऱ्या पेशंट्स आणि स्टाफमुळे सोसायटीला कोरोनाचा धोका आहे. आपल्या भागात इतर अनेक हॉस्पिटल्स आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होणार नाही. सरकारच्या नियमांंच आम्ही पालन करतो. त्यामुळे तातडीने हॉस्पिटल बंद करावं असं पत्रच या सोसायटीने त्या डॉक्टरांना दिलं आहे. अशा सोसायट्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता करण्यात येत आहे.

राज्यातला कोरोनाचा विळखा वाढतो आहे. आज मृतांची संख्या 127 एवढी झाली तर रुग्णांचा आकडा 1761वर गेलाय. तर आत्तापर्यंत 208 रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. तर राज्यात आज एकाच दिवसांत 17 जणांचा मृत्यू झाला. तर 187 नवे रुग्ण सापडले. मृत्यूझालेल्या 17 जणांमध्ये तब्बल 12 जण मुंबईतले आहेत. तर पुण्यात 2 जणांचा मृत्यू झाला. तर सातारा, धुळे आणि मालेगावमध्ये प्रत्येकी 1 जण दगावला अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. मृतांमध्ये पुरुषांचं प्रमाण जास्त असून ज्यांना डायबेटीज, ब्लडप्रेशर किंवा तर आजार आहेत अशांची मृतांमध्ये जास्त संख्या असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

राज्यात कोरोना मृतांची संख्या 127वर तर एकूण रुग्ण 1761

कोरोनाचा महाराष्ट्रात प्रकोप वाढत आहे. लॉकडाऊनही वाढविण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले देशातच कोरोनाच्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन देशात ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन करण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. मुंबई, ठाणे, पुणे कोरोनाच्या रेड झोनमध्येच असतील. तिथे लॉकडाऊनचं कठोरपणे पालन करावं लागेल. हे पालन योग्य पद्धतीने झालं नाही तर लॉकडाऊन आणखी वाढवावा लागेल असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला. मेट्रो सिटींमध्ये त्याचं योग्य प्रकारे पालन होत नाही असंही ते म्हणाले.

कोरोनाबरोबरच राज्याच्या काही भागात उद्या अवकाळीच्या संकटाचे ढग

महाराष्ट्रात तीन प्रकारचे रुग्णालये असणार आहेत. सोम्य, मध्यम आणि तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांना त्या त्या प्रमाणात तिथे दाखल केलं जाणार आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे हे रेड झोनमध्ये राहणार आहे. कारण एकूण रुग्णांमध्ये 91 टक्के हे याच भागात आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीत. महाराष्ट्रात पूल टेस्टिंग होणार असल्याचंही त्यांना सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात