जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोरोनाबरोबरच राज्याच्या काही भागात उद्या अवकाळीच्या संकटाचे ढग

कोरोनाबरोबरच राज्याच्या काही भागात उद्या अवकाळीच्या संकटाचे ढग

कोरोनाबरोबरच राज्याच्या काही भागात उद्या अवकाळीच्या संकटाचे ढग

कोरोना संकट राज्यावर असतानाच आता वादळी पावसाचं संकट महाराष्ट्रात काही भागात येऊ घातलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 एप्रिल : कोरोना संकट राज्यावर असतानाच आता वादळी पावसाचं संकट महाराष्ट्रात काही भागात येऊ घातलं आहे. वेधशाळेने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. आजसुद्धा कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. कुलाबा वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर यासह परभणी, जालना, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर या भागात वादळी वारे वाहतील आणि काही भागात जोरदार पाऊसही होईल. वेधशाळेने यलो वॉर्निंग दिली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हयातही पावसाचा अंदाज आहे. उन्हाळ्याचा कहर, अकोला देशात सर्वात उष्ण शहर एकीकडे राज्यात उकाडा प्रचंड वाढला आहे, तर दुसरीकडे वादळी पावसाचं वातावरण आहे. विदर्भात तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. नागपूर, अमरावती, वाशीम इथे पारा चाळिशीच्या जवळ होता. अकोल्यात 41.2 अंस सेल्सियस एवढा पारा शनिवारी पोहोचला. हे देशातलं सर्वात उष्ण शहर ठरलं. कोरोना पॉझिटिव्ह बॉलिवूड अभिनेत्रीचा अनुभव, डॉक्टरांबद्दल म्हणाली,‘शब्दच नाहीत’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात