Home /News /pune /

पुण्यात hoarding war: अजितदादा कारभारी लय भारी तर देवेंद्र नवपुण्याच्या विकासाचे शिल्पकार, पाहा PHOTOS

पुण्यात hoarding war: अजितदादा कारभारी लय भारी तर देवेंद्र नवपुण्याच्या विकासाचे शिल्पकार, पाहा PHOTOS

दादा कारभारी की देवेंद्र विकासाचा शिल्पकार? महापालिकेच्या तोंडावर नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होर्डिंगवर असलेल्या टॅग लाईनने संपूर्ण पुण्यात चर्चा.

पुणे, 20 जुलै: राज्यातल्या सगळ्यात दोन पावरफूल नेत्यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस असतो आणि ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis). अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस एकाच दिवशी येणार हा योगायोग (Devendra Fadnavis Ajit Pawar birthday on same day) आहे, मात्र सध्या राज्याचे शकट हाकण्यात या दोघांची महत्त्वाची भूमिका आहे. सत्ताधारी आणि विरोधक म्हणून त्यांचा संघर्ष जसा सभागृहात सुरू आहे तसाच तो पुण्यातही सुरू आहे आणि तो म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून. येत्या 22 जुलैला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी (NCP)ने शहरात जोरदार बॅनरबाजी (Hoarding war in Pune) केली आहे. येत्या सहा महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या असल्याने आपला नेता किती पावरफूल आहे हे दाखवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये जणू स्पर्धा लागली आहे. शहरातल्या सगळ्या प्रमुख चौकांमध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे भलेमोठे होर्डिंग लावण्यात आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या वाढदिवसाचे कॅम्पेन केले आहे त्याची टॅगलाईन आहे कारभारी लय भारी अशी आहे. तर भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं होर्डिंग कॅम्पेन केले त्याची टॅगलाईन आहे नव्या पुणाच्या विकासाचा शिल्पकार. OBC Reservation: "शरद पवार, मुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरात हे झारीतील शुक्राचार्य" चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात त्यामुळे गेले दोन दिवस शहरात लावण्यात आलेल्या या होर्डिंगमुळे राजकीय वर्तुळात अत्यंत खमंग चर्चा रंगल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते हे देवेंद्र फडणवीस कधीपासून पुण्याचे विकासाचे शिल्पकार झाले असा प्रश्न विचारत आहेत तर भाजपकडून शहरातले मेट्रो पासून जायका पर्यंतचे सगळे प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून आले असल्याचा दावा करतात. गेले पंधरा ते वीस वर्ष पुण्याच्या राजकारणावर अजित पवार यांची एक हाती पकड होती. मात्र राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर पंधरा वर्षांनंतर पुण्याला नवा पालकमंत्री गिरीश बापट यांच्या स्वरूपात मिळाला. सहाजिक त्यांच्या कामाचा वेग उरक या सगळ्या गोष्टींची बरोबरी अजित पवार यांच्या कामाचे स्टाईलचे केली गेली आणि उत्तर अपेक्षेप्रमाणे नकारात्मकच येत होतं. राज्य सरकार भाजपच असताना देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या 24 तास पाणीपुरवठा पासून मेट्रोपर्यंत सगळ्या मोठ्या प्रकल्पांमध्ये वैयक्तिक लक्ष घातलेलं होतं मात्र आजवर यातला एकही प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. आता अजित पवार यांनी पुन्हा पुण्याच्या पालकमंत्रिपदाचे सूत्र हातात घेतल्यानंतर वैयक्तिक स्तरावर लक्ष घालून त्यांनी महापालिकेत भाजपची सत्ता असतानाही मोठ्या प्रकल्पांना गती देण्याचा प्रयत्न केलाय आणि शहराबद्दलच्या त्यांच्या भूमिका अत्यंत स्पष्ट आणि कठोर आहेत. त्यामुळे पुण्याचा कारभारी म्हणून त्यांची ओळख आहे खरी पण आता महापालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपने देवेंद्र फडणवीस यांना पुण्याच्या विकासाचा शिल्पकार असा ब्रँड तयार करून राजकीय आव्हान दिले. देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादीचा टोला या होर्डिंग वॉरवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया देत फडणवीसांना टोला लगावला आहे. त्यांनी म्हटलं, देवेंद्र फडणवीस यांना नागपुरच्या बाहेरही कोण ओळखत नव्हतं त्यावेळेस पुणे हे सर्वाधिक जलद गतीने प्रगती करणारे महानगर म्हणून ओळखले जाऊ लागले. शरद पवार आणि अजितदादा यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थाने नव्या पुण्याची निर्मिती झाली. भारताचा आयटी हब म्हणून पुण्याने नावनौकिक मिळवला. इतकंच काय तर गुजरातमधील लोक सुद्धा आज नोकरी आणि शिक्षणासाठी येऊन राहतात. देवेंद्र फडणवीसजी आपल्या नावाची ओळख पुण्याला 2017 मध्ये झाली आणि त्यानंतरची दयनीय अवस्था पुणेकर पाहत आहेत.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Ajit pawar, Devendra Fadnavis

पुढील बातम्या