पिंपरी चिंचवड, 6 एप्रिल : चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंतीला होणाऱ्या वाकड-हिंजवडीसह तमाम मुळशी तालुक्याचे व पुणे जिल्ह्यातील असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री म्हातोबा देवाचे बगाड मिरवणूक प्रसिद्ध आहे. मात्र, या यात्रेला आज गालबोट लागले. यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या बगाड उत्सवामध्ये बगाडाचा शेला ज्याला शासन काठी ही म्हटलं जाते ती अचानक तुटल्याने भाविकांचां हिरमोड झाला. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. आयटी हब अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी भागात दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात बगाड उत्सव आयोजित करण्यात येतो. यावर्षी देखील आयोजित करण्यात आलेल्या बगाड उत्सवादरम्यान हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येत होती. त्याच दरम्यान बगाडावर मानकरी चढताच शेला तुटला. मात्र, या घटनेत कुणीही जखमी झाले नाही आणि मोठा अनर्थ टळला. मात्र, बगडाचा शेला एवढ्या वर्षात प्रथमच तुटल्याने पंचक्रोशीतील भाविकांमध्ये नाराजी बघायला मिळाली.
पिंपरी चिंचवडमध्ये श्री म्हातोबा देवाचे बगाड मोडल्याने भाविकांचा हिरमोड#hinjwadi #bagadyatra pic.twitter.com/4Y4h2vm5Y4
— News18Lokmat (@News18lokmat) April 6, 2023
हजारो वर्षांपासून सुरु असलेल्या या ऐतिहासिक बगाड मिरवणूकीत पहिल्यांदाच असं घडल्याने हजारो भाविकांचा हिरमोड झाला आहे. हनुमान जयंतीच्या म्हणजेच यात्रेच्या 10 दिवस आधी देव बसतात आणि वाकड-हिंजवडी ग्रामस्थांचा उपवास सुरू होतो. या 10 दिवसांत प्रत्येकाच्या घरी देवाची पूजा होत नाही, ना कुठला (लग्न, साखरपुडा, वास्तूशांती) सोहळा पार पाडतो. या काळात सर्व काही वर्ज्य असते. बगाडाला नैवद्य दाखवूनच उपवास सोडला जातो. वाचा - पहिले धडक दिली, लोक ओरडली पण त्याने पुन्हा गाडी पुढे घेतली, चिमुरडीच्या मृत्यूचा LIVE VIDEO हनुमान जयंतीला दुपारी 4 नंतर हिंजवडी गावाठानातून वाकडच्या दिशेने बगाड मीरवणूक निघते, मिरवणूक पाहण्यासाठी व दर्शनासाठी मुळशी तालुका, पिंपरी चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्यातून भाविक वाकड हिंजवडीत जमतात. उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या बगाडाच्या प्रथेला सुरुवात कधी पासून झाली याबाबत नेमके गावातील कोणालाही काहीही सांगता येत नाही. वर्षानुवर्षे चालत आलेला हा पिढी-परंपरागत उत्सव असून अनेक पिढ्यांनी हि प्रथा जोपासली, बगाड परंपरा वारसा रूपाने पुढच्या पिढीकडे आली. वाकड गावठाणातील मंदिराच्या जुन्या गाभाऱ्याच्या चौकटीला शिल्प होते. त्यावर सोळाशे पस्तीस असे कोरलेले आढळले असल्याने इसवी सन सोळाशे पस्तीस साली म्हातोबा महाराजाचे मंदिर बांधले आहे. त्याच्या ही अगोदर वाकड हिंजवडीत देवाचे अस्तित्व असल्याचे मानले जाते.