जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / पहिले धडक दिली, लोक ओरडली पण त्याने पुन्हा गाडी पुढे घेतली, चिमुरडीच्या मृत्यूचा LIVE VIDEO

पहिले धडक दिली, लोक ओरडली पण त्याने पुन्हा गाडी पुढे घेतली, चिमुरडीच्या मृत्यूचा LIVE VIDEO

मुलीच्या अंगावरुन ढंपरचं चाक गेलं..

मुलीच्या अंगावरुन ढंपरचं चाक गेलं..

मुंबईतील दहिसर भागात एका ढंपरने शाळकरी मुलीला चिरडलं आहे.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

दिवाकर सिंह, प्रतिनिधी मुंबई, 6 एप्रिल : मुंबईतील दहिसर परिसरात काळाजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. शाळेत जाणाऱ्या मुलीला आणि तिच्या आईला एका ढंपरने मागून धडक दिली. गाडीच्या धक्क्याने खाली पडलेल्या मुलीवर ढंपरचे चाक गेले. यावेळी लोकांनी ढंपर मागे घेण्याची सूचना केली तर चालकाने तो पुढे घेतल्यामुळे चिमुरडीच्या अंगावरुन संपूर्ण चाक गेले. या अपघातात या चिमुरडीचा जागेवरच मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. काय आहे घटना? मुंबईतील दहिसर परिसरातील रस्ते नेहमी गर्दीने फुललेले असतात. आज एक महिला आणि तिच्या आठ वर्षीय मुलीला शाळेत घेऊन जात होती. महिलेच्या हातात पिशवी होती. गर्दीतून वाट काढत पुढे जात असताना एका ढंपरने मायलेकींना मागून धडक दिली. या धक्क्याने दोघीही रस्त्यावर कोसळल्या. यात मुलगी ढंपरच्या पुढच्या चाकाखाली आली. उपस्थित लोकांनी आरडाओरडा करत गाडी मागे घेण्याची सूचना केली. मात्र, चालकाने ढंपर पुढे घेतल्याने संपूर्ण चाक मुलीच्या अंगावर गेले. इतक्या वजनाचा ढंपर अंगावर चढल्याने मुलीचा जागीच मृत्यू झाला.

जाहिरात

अपघातानंतर मुलीच्या आईने आपल्या मुलीला उचलून बाजून नेले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. तर अपघातानंतर चालकाने उडी मारुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता मुंबई पोलीस करत आहेत. मुंबई पुणे महामार्गावर अपघातात चौघांचा जागीच मृत्यू मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेस वेवर उर्से टोल नाक्याजवळ कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात कार मधील चार प्रवासी जागीच ठार झाले. मुंबईवरून येणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात झाला. अतिवेगात असलेल्या कारने मालवाहू ट्रकला मागून जोराची धडक दिली. यामध्ये कारचा दर्शनी भाग ट्रकच्या मागील बाजूस पूर्ण घुसल्याने कार मधील चार प्रवासी जागीच ठार झाले. ही घटना उर्से टोल नाक्याजवळील 82 किलोमीटरवर घडली, घटनास्थळी शिरगावं परंदवडी पोलीस, देवदूत रेस्कु टीम आणि आयआरबी कर्मचारी दाखल झाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात