मराठी बातम्या /बातम्या /पुणे /शुभमंगल Online! पुण्यात पार पडलं हायटेक लग्न; Zoom कॉलवर 100 वऱ्हाडीही उपस्थित

शुभमंगल Online! पुण्यात पार पडलं हायटेक लग्न; Zoom कॉलवर 100 वऱ्हाडीही उपस्थित

Marriage story in Pune: पुण्यातील एका जोडप्यानं अनोखी शक्कल लढवत घरातचं थाटात लग्न केलं आहे. त्यासाठी त्यांनी झूम मीटिंगद्वारे (Zoom meeting) 100 नातेवाईकांना आणि  मित्र परिवाराला जोडून घेतलं होतं.

Marriage story in Pune: पुण्यातील एका जोडप्यानं अनोखी शक्कल लढवत घरातचं थाटात लग्न केलं आहे. त्यासाठी त्यांनी झूम मीटिंगद्वारे (Zoom meeting) 100 नातेवाईकांना आणि मित्र परिवाराला जोडून घेतलं होतं.

Marriage story in Pune: पुण्यातील एका जोडप्यानं अनोखी शक्कल लढवत घरातचं थाटात लग्न केलं आहे. त्यासाठी त्यांनी झूम मीटिंगद्वारे (Zoom meeting) 100 नातेवाईकांना आणि मित्र परिवाराला जोडून घेतलं होतं.

पुणे, 28 एप्रिल: कोरोना विषाणूच्या (Corona virus) प्रादुर्भावामुळे राज्यात सध्या लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळातील कडक नियमावलीचा जबरदस्त फटका लग्न समारंभाना (Marriages during lockdown) बसला आहे. केवळ 25 नातेवाईक आणि 2 तासाच्या आत विवाहसोहळा उरकण्याचा नवीन नियम राज्य सरकारने लागू केला आहे. यामुळं नातेवाईक आणि मित्र मंडळींना बोलवून दणक्यात लग्नाचा बार उडवण्याचा मनसुबा असणाऱ्या अनेकांचा हिरमोड झाला आहे. अनेकांना अगदी साध्या पद्धतीनं लग्न करावी लागत आहेत. त्यामुळे पाहुण्यासोबत नवं वधू-वरांमध्ये नाराजी दिसत आहे.

अशी एकंदरित परिस्थिती असताना, पुण्यातील केशव विध्वंस आणि प्रियंका कोडीलकर या नवीन वधू वराने अनोखी शक्कल लढवत थाटात लग्न केलं आहे. त्यांनी लग्नाचा सर्व कार्यक्रम घरीच उरकला आहे. त्यामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या 2 तासाच्या नियमाला कोणताही धोका न पत्करता तिलांजली दिली आहे. एवढंच नव्हे तर झूम मीटिंगद्वारे (Zoom meeting) त्यांच्या लग्नाला 100 नातेवाईकांनी आणि  मित्र परिवाराने उपस्थिती दर्शवली होती. त्यामुळं 25 किंवा 50 नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पाडण्याच्या नियमाला ही बगल दिली आहे. त्यांनी कोरोना विषाणूच्या अभूतपूर्व समस्यांना नवीन उपाय शोधून हायटेक लग्न केलं आहे.

केशव आणि प्रियांका या जोडप्याचा हा प्रेमविवाह होता. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. केशव हा व्यावसायिक असून त्याचे वडील जेऊर परिसरात भिक्षुकी करतात. तर प्रियंकाचे वडील भीमाशंकर मंदिरातील पुजारी आहेत. कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेत 50 जणांच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा पार पडला होता. त्यामुळे लग्न किमान 100 लोकांच्या उपस्थितीत करण्याची त्यांची इच्छा होती.

हे वाचा- Positive News: व्हेंटिलेटरवर असणाऱ्या कोरोनाबाधित आईनं दिला बाळाला जन्म, सुदैवानं दोघंही सुखरुप

पण कोरोना विषाणूची दुसरी लाट आल्यानं त्यांच्या स्वप्नांना सुरुंग लागला. पण असं असलं तरी, हतबल होऊन लग्न पुढं न ढकलता मोजक्या नातेवाईकांच्या हजेरीत घरीच लग्न करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. शिवाय झूम मिटींगच्या माध्यमातून मित्रपरिवार आणि नातेवाईंकांनाही जोडून घेतलं. त्यांच्या या अनोख्या लग्नाची सोशल मीडियावर जोरात चर्चा सुरू आहे.

First published:

Tags: Marriage, Pune