मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

दक्षिण भारतात पावसाचं थैमान; महाराष्ट्रावर दुहेरी संकट, काय असेल पुण्यातील हवामान?

दक्षिण भारतात पावसाचं थैमान; महाराष्ट्रावर दुहेरी संकट, काय असेल पुण्यातील हवामान?

Weather Update: पूर्व किनारपट्टीवरील चक्रवात स्थिती आणि पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रातील हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या रुपात महाराष्ट्रावर दुहेरी संकट आहे. पण याचा महाराष्ट्राला फटका बसण्याची शक्यता खूप कमी आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 08 नोव्हेंबर: दिवाळीनंतर दक्षिण भारतात ईशान्येकडील मान्सून सक्रिय (rain in southern india) झाला आहे. गेल्या काही तासांपासून आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू किनारपट्टीच्या भागात पावसानं अक्षरश: थैमान घातलं आहे. गेल्या चोवीस तासांत चेन्नईसह तामिळनाडूतील 11 जिल्ह्यांमध्ये 20 सेमी पेक्षा अधिक पाऊस कोसळला आहे. चेन्नईतील नुगंमबक्कम केंद्रात 215 मिमी आणि डीजीपी केंद्रात 227 मिमी पाऊस कोसळला आहे. धुवाधार पावसामुळे चेन्नईतील अनेक रस्ते दुथडी भरून वाहत आहेत. तर अनेक घरांमध्ये पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झालं आहे.

खरंतर, सध्या तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर पूर्व किनारपट्टी भागात चक्रवात स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे 9 नोव्हेंबरपर्यंत पूर्व किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन 10 आणि 11 नोव्हेंबर रोजी तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या पूर्व किनारपट्टी परिसरात अतिवृष्टीची शक्यता आहे. दुसरीकडे, पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून जोरदार वारे वाहत आहेत.

हेही वाचा-सावधान! माणसांपाठोपाठ आता पाळीव प्राण्यांमध्ये आढळला कोरोनाचा 'अल्फा' व्हेरिएंट

पूर्व किनारपट्टीवरील चक्रवात स्थिती आणि पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रातील हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या रुपात महाराष्ट्रावर दुहेरी संकट आहे. सुदैवाची बाब म्हणजे अरबी समुद्रात निर्माण झालेला हवेच्या कमी दाबाचं  क्षेत्र भारतीय किनारपट्टीपासून दूर जात आहे. तर पूर्व किनारपट्टीवरील चक्रवात स्थितीचा काही प्रमाणात महाराष्ट्रावर परिणाम होऊ शकतो. सध्या कोकण परिसरात वादळी वाऱ्यांचा धोका वाढत आहे. पुढील पाच दिवस महाराष्ट्रात कोणताही इशारा दिला नसून सर्वत्र कोरड्या हवामानाची शक्यता आहे.

हेही वाचा-अरबी समुद्रात वादळी वारे; मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा, काय असेल मुंबईत स्थिती?

काय असेल पुण्यातील हवामान?

पुणे शहर आणि जिल्ह्यात पुढील आठवडाभर कोरडं हवामान राहणार आहे. त्यामुळे येत्या काळात पुण्यातील किमान तापमानात काहीअंशी घट होण्याची शक्यता आहे. रविवारी शहरात 20.6 अंश सेल्सिअस तर लोहगावात 20.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुढील दोन तीन दिवसात किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. तसेच पहाटे हवेत गारवा वाढण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Weather, महाराष्ट्र