सराईत गुन्हेगार मित्र द्यायचा त्रास, ओंकारने घरामागेच खोदला खड्डा अन्....

सराईत गुन्हेगार मित्र द्यायचा त्रास, ओंकारने घरामागेच खोदला खड्डा अन्....

ओंकारने त्याची वेळोवेळी समजूत काढली पण 16 तारखेला किरण पुन्हा दारू पिऊन घरी आला आणि वाद घातला.

  • Share this:

पुणे, 23 ऑगस्ट : लॉकडाउनच्या काळात शांत असलेली पुणे शहरात आता गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे.  दारू पिऊन सतत त्रास देतो म्हणून एका सराईत गुन्हेगाराची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना शहरातील कात्रज परिसरात घडली. धक्कादायक म्हणजे,  खून करून त्याचा मृतदेह आरोपीने आपल्याच घराच्या मागे पुरला होता.

किरण डोळे असं खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका आरोपीला अटक केल आहे.ओंकार संजय जोरी असं या आरोपीचं नाव आहे. त्याने आपल्या तीन मित्रांच्या मदतीने किरण डोळेचा खून केला असल्याचं कबूल केले आहे.

पुण्यासमोर नवे संकट, ग्रामीण भागातून आली धक्कादायक माहिती समोर

किरण डोळेवर शहरातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहे. त्याला दोन वर्षांपूर्वी या भागातून तडीपार करण्यात आले होते.  किरण हा आपल्या आई, वडील आणि पत्नीसह आगम टेकडी परिसरातील एका चाळीत राहत होता. सहा महिन्यापूर्वीच त्याचे लग्न झाले होते. यात वस्ती राहणारा आरोपी ओंकार जोरी हा किरणचा मित्र होता.  किरण डोळे हा दारूच्या आहारी गेला होता. दारू प्यायल्या नंतर किरण हा आरोपी ओंकारच्या घरी जायचा आणि त्याच्या कुटुंबीयांना त्रास द्यायचा. ओंकारने त्याची वेळोवेळी समजूत काढली होती. पण 16 तारखेला किरण पुन्हा दारू पिऊन ओंकारच्या घरी गेला आणि वाद घातला. त्यामुळे संतापलेल्या ओंकारने आपल्या तीन मित्रांच्या मदतीने किरणचा धारदार शस्त्राने वार करून खून केला.

किरणचा खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ओंकारने आपल्याच घराची निवड केली. घराच्या मागे खड्डे खोदले आणि त्यात मृतदेह पुरला. किरण घरी न आल्यामुळे त्याच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

महत्त्वाची बातमी, ठाकरे सरकारने कोरोना चाचणीबद्दल काढला नवा आदेश

पोलिसांनी परिसरात चौकशी सुरू केली आणि ओंकारचे घर गाठले. पण ओंकार हा घरी नव्हता. तो आपल्या कुटुंबासह पसार झाला होा.  तेव्हा पोलिसांना ओंकारच्या घरातून दुर्गंधी आली. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला. पोलिसांनी ओंकारच्या घरामागील अंगणात खोदल्यानंतर किरणचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला.

पोलिसांनी या प्रकरणी ओंकार जोरीच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Published by: sachin Salve
First published: August 23, 2020, 12:36 PM IST

ताज्या बातम्या