मराठी बातम्या /बातम्या /पुणे /'उगाच पलटन वाढवू नका, देवाची कृपा नसते आम्हाला माहितीये' अजितदादांच्या सल्ला आणि एकच हश्शा

'उगाच पलटन वाढवू नका, देवाची कृपा नसते आम्हाला माहितीये' अजितदादांच्या सल्ला आणि एकच हश्शा

'माझी महिलांना विनंती आहे की, आपली सून आली, मुलगी असेल, तिचं लग्न झालं तर 2 अपत्यावर थांबा. पोरी सोन्यासारख्या आहे.

'माझी महिलांना विनंती आहे की, आपली सून आली, मुलगी असेल, तिचं लग्न झालं तर 2 अपत्यावर थांबा. पोरी सोन्यासारख्या आहे.

'माझी महिलांना विनंती आहे की, आपली सून आली, मुलगी असेल, तिचं लग्न झालं तर 2 अपत्यावर थांबा. पोरी सोन्यासारख्या आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Baramati, India

बारामती, 15 जानेवारी : 'माझी महिलांना विनंती आहे की, 2 अपत्यावर थांबा. जास्त पलटण वाढवू नका. वंशाच्या दिव्याच्या मागे लागू नका. पवार साहेब एका मुलीवर थांबले. तसेच तुम्ही देखील थांबा. नाहीतर म्हणाल की, देवाची कृपा, देवाची कृपा आहे. आम्हाला माहिती आहे कोण कृपा करते आहे' अशी टोलेबाजी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. सकाळी बारामती शहरातील विकास कामांची पाहणी अजित पवारांनी केली त्यानंतर गरजू महिलांना 1 हजार स्वेटर, 500 साडी वाटप तसेच 15 सिलाई मशीनचे वाटप अजित पवारांच्या हस्ते झालं. त्यावेळी अजित पवार बोलत होते.

'माझी महिलांना विनंती आहे की, आपली सून आली, मुलगी असेल, तिचं लग्न झालं तर 2 अपत्यावर थांबा. पोरी सोन्यासारख्या आहे. जास्त पलटण वाढवू नका. वंशाच्या दिव्याच्या मागे लागू नका. पवार साहेब एका मुलीवर थांबले. सुप्रियाताईंनी नाव काढलं नाही का? नुसतं पोरगंच पाहिजे, पोरगंच पाहिजे, असं करू नका. तुम्ही देखील थांबा नाहीतर म्हणाल की, देवाची कृपा देवाची कृपा आहे. देव वरून देतोय, आम्हाला माहिती नाही का कुणाची कृपा आहे, असं आवाहन करताच सभागृहात एकच हश्शा पिकली.

(बीडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; युवक जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, सोळंके घराणं नाराज?)

'समाजामध्ये महिलांकडे कोणी वाकड्या नजरेने बघू नये कोणी दहशत गुंडगिरी पसरवण्याच्या काम करू नये. कोयता गॅंग अन फोयता ग्यांग आसल अजिबात चालणार नसुन याची नोंद पोलिस खात्याने घ्यावी मी कधीही चुकीच्या गोष्टींवर पांघरून टाकलेले नाही. बारामतीत वेडे वाकडे धंदे होता कामा नये, असंही अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं.

'जर कुठ चुकत असेल तर माझ्या निदर्शनास आणून द्या, त्यावर मी तुम्हाला आधार देण्याचे काम करेल. जस घर स्वच्छ ठेवता, तसे शहर स्वच्छ ठेवा.कृषी प्रदर्शन भरवतो आहोत. कुणी कुठंही टपऱ्या टाकू नका, असा सल्लाही अजित पवारांनी केला.

(बीडमध्ये फडणवीसांच्या कार्यक्रमाला मुंडे भगिणी पुन्हा गैरहजर, राजकीय चर्चांना उधाण)

'बारामतीचा विकास करताना सामाजिक संस्थांची मदत घेतो. काही ठिकाणी आपण आपला स्वतचा खर्च करून काही कामे करतो. सायकली दिल्या तर त्या चांगल्या पध्दतीने ठेवा. कॅनॉल चांगला केला आहे. तर कॅनॉल आटला की त्यात गोधड्या आणून टाकू नका, अशी विनंतीही अजितदादांनी केली.

First published:

Tags: Ajit pawar, अजित पवार, कुटुंब नियोजन, बारामती