मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुण्यातील द्राक्ष बागायतदार संकटात; उभ्या पिकावर चालवली कुऱ्हाड

पुण्यातील द्राक्ष बागायतदार संकटात; उभ्या पिकावर चालवली कुऱ्हाड

News 18 लोकमत प्रतिनिधीने हताश होऊन द्राक्ष बाग तोडणाऱ्या काही शेतकऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे...

News 18 लोकमत प्रतिनिधीने हताश होऊन द्राक्ष बाग तोडणाऱ्या काही शेतकऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे...

News 18 लोकमत प्रतिनिधीने हताश होऊन द्राक्ष बाग तोडणाऱ्या काही शेतकऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे...

जुन्नर, 13 मार्च : मागील वर्षभर सुरू असलेला निसर्गाचा लहरीपणा आणि कोरोनाचा कहर यामुळे अपेक्षित बाजार भाव मिळत नसल्याने पुणे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक मेटाकुटीस आला आहे. महागडी औषधं, खते, फवारणी खर्च व मजुरी वाढल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे वैतागून शेतकरी द्राक्ष बागांवर कुऱ्हाड चालवू लागले आहेत. आंबेगाव तालुक्यातील कळंब व लवकी परिसरातील शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेतील झाडांवर थेट कुऱ्हाड चालवून उभी असलेली द्राक्ष बाग आडवी केली आहे. (Grape growers in Pune in crisis The ax driven on the vertical crop)

गेल्या वर्षी कोरोनामुळे मातीमोल बाजारभावाने द्राक्ष विकण्याची वेळ आली. या वर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका निर्यातक्षम द्राक्ष बागांना बसला आहे. कमी-अधिक द्राक्ष असलेला शेतकरी हवालदिल झाला आहे, अशी परिस्थिती दर वर्षी कायम राहिली तर द्राक्ष उत्पादकांनी कसे जगायचे, केलेला वारेमाप खर्च वसूल होईल का? असे अनेक प्रश्न उत्पादकांना सतावत आहेत. उत्पन्नाअभावी घेतलेले लाखो रुपयांचे कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना सतावू लागला आहे. मेहनत घेऊन निसर्गापुढे हतबल होण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

हे ही वाचा-पुण्यात 18 वर्षावरील सर्वांना सरसकट लसीकरण; केंद्र सरकारकडे केली जाणार शिफारस

याबाबत News 18 लोकमत प्रतिनिधीने हताश होऊन द्राक्ष बाग तोडणाऱ्या काही शेतकऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे...

- "या वर्षी वातावरणातील बदलामुळे द्राक्ष पिकांसाठी उत्पादन खर्चात वाढ झाली. मिळणारा बाजारभाव पाहता खर्चही वसुल होईल की नाही, याची शाश्वती नाही. त्यामुळे द्राक्ष शेती आता तोट्याची होऊ लागली आहे. द्राक्षांची निर्यात होण्याबरोबरच पूरक उद्योगधंदे या भागात उभे राहणे गरजेचे आहे. बाजार समित्यांच्या आवारात द्राक्ष व्यापाऱ्यांना द्राक्ष खरेदीचे परवाने द्यावेत. जेणे करून विशिष्ट व्यापाऱ्यांची मक्तेदारी मोडीत निघण्यास मदत होईल,’’ असे शेतकरी अजित थोरात यांनी सांगितले.                - या वर्षी द्राक्ष बागेवर एकूण 18 लाख रुपये खर्च केला. उत्पन्न मात्र नऊ लाख रुपये मिळाले. हीच परिस्थिती गेल्या दोन वर्षापासून होत आहे. नफ्यापेक्षा नुकसानीचे प्रमाण वाढल्यामुळे बारा एकर क्षेत्रापैकी सहा एकर क्षेत्रातील द्राक्ष बाग तोडून टाकण्याचा निर्णय घेतला आहे,’’ असे शेतकरी मयूर वाव्हळ यांनी सांगितले.

- शासनाने द्राक्ष बागायतदारांना वेळीच सावरले नाही किंवा आर्थिक मदत केली नाही तर भविष्यात द्राक्ष पट्यात द्राक्षबागा कमी होऊन 'कॅश क्रॉप' अशी ओळख निर्माण करणाऱ्या भागात द्राक्ष पिकाखालील क्षेत्र कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

First published:
top videos

    Tags: Pune