मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Pune : बकरी ईद निमित्त भरला बकऱ्यांचा बाजार; बाजारात रॅम्बो बकऱ्याची होतीय चर्चा, पहा VIDEO

Pune : बकरी ईद निमित्त भरला बकऱ्यांचा बाजार; बाजारात रॅम्बो बकऱ्याची होतीय चर्चा, पहा VIDEO

X
पुण्यातील

पुण्यातील लक्ष्मी बाजारात राजस्थान येथून आलेल्या रॅम्बो बकरा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक हे गर्दी करताना दिसत ( goats demand Increased ) आहेत. या रॅम्बो बकऱ्याची उंची ही 7 फुटाची असून तो राजस्थान येथील कालपी येथून आला आहे. आणि त्याची किंमत ही 60 हजार रुपये आहे.

पुण्यातील लक्ष्मी बाजारात राजस्थान येथून आलेल्या रॅम्बो बकरा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक हे गर्दी करताना दिसत ( goats demand Increased ) आहेत. या रॅम्बो बकऱ्याची उंची ही 7 फुटाची असून तो राजस्थान येथील कालपी येथून आला आहे. आणि त्याची किंमत ही 60 हजार रुपये आहे.

पुढे वाचा ...

    पुणे, 8 जुलै : गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण उत्सव साध्या पद्धतीने साजरी करण्यात आले. पण यंदा कोरोनाचे संकट कमी झाल्याने सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरी होत आहेत. मुस्लिम बांधवांचा प्रमुख सणांपैकी एक असलेल्या बकरी ईदचा (Bakri Eid) सण रविवारी साजरा होणार आहे. या निमित्ताने बकऱ्याची बळी देण्याला महत्त्व असते. यासाठी लागणारे बोकड महाराष्ट्रातील विविध भागातून पुण्यामध्ये (Pune city) विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. पुण्यातील भवानी पेठेतील लक्ष्मी बाजारात विक्रीसाठी आलेल्या रॅम्बो बकऱ्याची ( Rambo goat ) सध्या चर्चा होत आहे.

    रॅम्बो बकरा पाहण्यासाठी मोठी गर्दी

    राजस्थान येथील कालपी येथून रॅम्बो बकरा बघण्यासाठी पुण्यातील लक्ष्मी बाजारात मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करताना दिसत आहेत. या रॅम्बो बकऱ्याची उंची ही तब्बल 7 फुटाची असून याच त्याच्या अवाढव्य उंची मुळे त्याला 60 हजार रुपये एवढी किंमत मोजावी लागते आहे. अश्या या धिप्पाड रॅम्बोला बघण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत आहे.

    वाचा : Big News : महावितरणाकडून सर्वसामान्यांना मोठा झटका; वीज बिलात 200 रुपयांपर्यंत वाढ

    पुण्यातील भवानी पेठ येथील लक्ष्मी बाजारात औरंगाबाद, जालना, बीड, अहमदनगर, परभणी, मुंबई, कल्याण, ठाणे तसेच देशभरातून विविध ठिकाणांहून बोकड  विक्रीसाठी आणले जात आहेत. साधारणपणे 10 हजारांपासून बोकड विक्रीसाठी उपलब्ध असून तब्बल 60 हजारापर्यंत एवढी बोकडांची किंमत आहे.

    याबाबत बोकड बाजाराचे अध्यक्ष घोलप यांनी सांगितले की, "तब्बल दोन वर्षानंतर बाजार सुरू झालं असला तरी यंदाच्या बोकड बाजारात अजून तरी ग्राहकांचा प्रतिसाद नाहीये. तसेच ईद रविवारी असल्यामुळे लोकं बोकड आधी खरेदी करण्यापेक्षा उशिरा खरेदी वरती भर देत आहे. कारण की मुख्यत्वे अनेक लोक आता सध्या फ्लॅट किंवा इतर ठिकाणी राहत आहे. अशा ठिकाणी बोकड बांधण्याला प्रॉब्लेम येतात. त्यामुळे रविवारच्या बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल अशी अपेक्षा आहे."

    First published:
    top videos

      Tags: Goat, Pune, Pune news