जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Big News : महावितरणाकडून सर्वसामान्यांना मोठा झटका; वीज बिलात 200 रुपयांपर्यंत वाढ

Big News : महावितरणाकडून सर्वसामान्यांना मोठा झटका; वीज बिलात 200 रुपयांपर्यंत वाढ

येत्या काळात नागरिकांना वीज बिलाचे (Electricity bill hike) चटके सहन करावे लागणार असल्याचं सांगितलं जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 8 जुलै : येत्या काळात नागरिकांना वीज बिलाचे (Electricity bill hike) चटके सहन करावे लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज्य वीज नियामक आयोगाने वीज कंपन्यांनी वीज बिलातून इंधन समायोजन आकार वसूल करण्याबाबत मंजूरी दिली आहे. परिणामी दरवाढ होणार असल्याची चर्चा आहे. इंधन समायोजन आकार म्हणजे वीज खरेदी खर्चात वाढ होईल. जून महिन्याच्या बिलात ही वाढ लागू होईल. महावितरणच्या वीज ग्राहकांना इंधन समायोजन आकारामुळे प्रति युनिट सरासरी एक रुपया मोजावा लागणार आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या चार महिन्यात वीज खरेदीवर झालेला खर्च भरून काढण्यासाठी वीज बिलात ग्राहकांसाठी इंधन समायोजन आकार लागू केला जाणार आहे. त्यामुळे अदानी इलेक्ट्रिसिटीच्या वीज ग्राहकांना प्रति युनिट सरासरी 92 पैसे इतकी वाढ मोजावी लागेल. तर टाटा पॉवरच्या ग्राहकांना प्रति युनिट सरासरी 1 रुपये 5 पैसे इतक्या वाढेला सामोरं जावं लागेल. लोकमतने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. कशी असेल वाढ.. जर एखाद्याला 500 रुपये बिल येत असेल तर त्यात वाढ होऊन 580 पर्यंत वीज बिल जाऊ शकतं. याशिवाय जर 1 हजार रुपये बिल येत असेल तर त्यात 200 रुपयांची वाढ होईल. याशिवाय 1500 रुपये बिल येत असल्यास हा आकडा 1700 पर्यंत जाऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात