पुण्यात 4 फूटी मूर्तीवरून वाद! मानाची गणेश मंडळं आणि प्रशासन आमने-सामने

पुण्यात 4 फूटी मूर्तीवरून वाद! मानाची गणेश मंडळं आणि प्रशासन आमने-सामने

कोरोना महामारीमुळे पुण्यातील गणेशोत्सवाच्या तयारीवर काहीसा निरूत्साह पसरल्याचं जाणवत आहे.

  • Share this:

पुणे,15 जुलै: कोरोना महामारीमुळे पुण्यातील गणेशोत्सवाच्या तयारीवर काहीसा निरूत्साह पसरल्याचं जाणवत आहे. अशातच शासनानं 4 फूटी मूर्तीचं बंधन घातल्यानं मानाची गणेश मंडळं आणि प्रशासन पुन्हा आमने-सामने उभे ठाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा...चिंताजनक! पुणे शहरालगतच्या 23 गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग, प्रशासनानं घेतला मोठा निर्णय

पुण्यातील कोरोना रूग्णांच्या ट्रेसिंगसाठी आणि आरोग्य सेवेसाठी सार्वजनिक गणेश मंडळांची नेमकी कशी मदत करून घेता येईल, या उद्देशाने विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी बैठक घेतली. पुण्यातील मानाची गणे मंडळ प्रमुख आणि शहरातील गणेश मंडळांच्या अध्यक्ष या बैठकाला उपस्थित होते. त्यात गणेश मंडळांनी आरोग्य यंत्रणेला सर्वोतपरी सहकार्य करण्याचं आश्वासनही दिलं. पण 4 फूटीच्या मूर्तीचा मुद्दा चर्चेला येताच मानाच्या गणेश मंडळांनी ऊत्सव मूर्ती आहे तीच राहणार असल्याचं ठामपणे सांगितलं. एवढंच नाहीतर हा 4 फूटी मूर्तीच्या बंधनचा मुद्दा फक्त मुंबईपुरताच सिमीत असल्याचा दावा केला. विशेष म्हणजे पुणे मनपातही बऱ्यापैकी हीच मंडळी पदाधिकारी आहेत.

दरम्यान, कोरोनाच्या साथीमुळे गणेश मूर्तीच्या बाजारपेठेतही यंदा काहीसा निरूत्साह बघायला मिळत आहे. लोक यावेळी स्वत: हून छोट्या मूर्तीच घेणं पसंत करत आहेत. राज्य सरकारनं 4 फूटांवरच्या गणेशमूर्तीवर बंदी घातल्यामुळे मूर्तीकारांचंही मोठं आर्थिक नुकसान होत आहे.

हेही वाचा...महापालिका आयुक्तांना अश्लिल शिवीगाळ, मनसेच्या उपजिल्हाध्यक्षाला अटक

गणेश मूर्तींचा बाजार ओस पडलेला असतानाच 4 फूटांपुढच्या मूर्ती वादावर प्रशासन नेमकं काय तोडगा काढतंय? याबद्दल गणेश भक्तांमध्ये काहीसं संभ्रमाचं वातावरण आहे. आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: July 15, 2020, 2:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading