पुण्यात कोरोनामुळे 4 जणांचा मृत्यू, कोरोनामुळे अवयव झाले होते निकामी

पुण्यात कोरोनामुळे 4 जणांचा मृत्यू, कोरोनामुळे अवयव झाले होते निकामी

मृतांमध्ये 65 वर्षांची महिला, 30 वर्षाचा तरुण आणि 44 वर्षांच्या पुरुष आणि आणखी एका व्यक्तीचा समावेश आहे.

  • Share this:

पुणे, 18 एप्रिल : राज्यात कोरोनाने कहर केला आहे. यामध्ये सगळ्यात रुग्ण हे पुणे आणि मुंबईत आढळले आहेत. पुण्यात काल दिवसभरात 59 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे तर करोनाबाधीत चौघांचा मृत्यू झाला आहे. या वाढत्या आकड्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे सध्या पुणेकरांना सगळ्यात जास्त काळजी घेण्याची गरज आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये 65 वर्षांची महिला, 30 वर्षाचा तरुण आणि 44 वर्षांच्या पुरुष आणि आणखी एका व्यक्तीचा समावेश आहे. मृत व्यक्तींना आधीच अनेक आजार होते. त्यात त्यांना करोनाची लागण झाली. अनेक आजार असल्यामुळे या रुग्णांची रोगप्रतिकारक्षमता अत्यंत कमी होते. त्यामुळे त्यांना लगेच कोरोनाची लागण झाली. कोरोना झाल्यानंतर हळूहळू अवयय निकामी होत गेले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे वयस्कर आणि आजारी लोकांची अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

पुण्यात नायडू हॉस्पिटलमध्ये एकूण 256 रुग्णांवर उपचार सुरू आहे. महापालिकेच्या नायडू हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या चौघे करोनाबाधीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. दहा क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. चार ससूनमध्ये तर इतर सहा जणांवर खासगी हॉस्पिटलांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे ही सकारात्मक बाब असली तरी इतरांनी काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

कोरोना व्हायरसची जगभरातील 24 तासांती अपडेट वाचा एका क्लिकवर

पुण्यामध्ये एकूण कोरोना रुग्णांची संख्या 580 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत तब्बल 47 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, आज कोरोनाबाधित 118 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या 3320 झाली आहे. आज दिवसभरात 31 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 331 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आज दिवसभरात 7 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाने 201 बळी घेतले आहेत.

टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 61 हजार 740 नमुन्यांपैकी 56 हजार 964 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 3320 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 74 हजार 587 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 6376 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

भारतीय नौदलावर कोरोनाचा मोठा हल्ला, एकावेळी 20 जवान संक्रमित

आज राज्यात 7 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे 5, पुण्यातील 2 जण आहेत. त्यापैकी 5 पुरुष तर 2 महिला आहेत. आज झालेल्या 7 मृत्यूपैकी 6 जण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या 7 जणांपैकी 5 रुग्णांमध्ये ( 71 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 201 झाली आहे.

राज्यात कोरोनाबळींची संख्या 200 पार; आतापर्यंत 3320 रुग्ण

संकलन, संपादन - रेणुका धायबर

First published: April 18, 2020, 8:40 AM IST

ताज्या बातम्या