राज्यात कोरोनाबळींची संख्या 200 पार; आतापर्यंत 3320 रुग्ण

राज्यात कोरोनाबळींची संख्या 200 पार; आतापर्यंत 3320 रुग्ण

राज्यात आज कोरोनाबाधित 118 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या 3320 झाली आहे. कुठल्या शहरात किती रुग्ण पाहा तपशीलवार यादी

  • Share this:

मुंबई, 17 एप्रिल : राज्यात आज  कोरोनाबाधित 118 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या 3320 झाली आहे. आज दिवसभरात 31 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 331 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आज दिवसभरात 7 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाने 201 बळी घेतले आहेत.

टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६१ हजार ७४० नमुन्यांपैकी ५६ हजार ९६४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३३२०  जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७४ हजार ५८७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ६३७६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे ५, पुण्यातील २ जण  आहेत. त्यापैकी  ५  पुरुष तर  २  महिला आहेत. आज झालेल्या ७  मृत्यूपैकी ६ जण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत.  मृत्यूमुखी पडलेल्या ७ जणांपैकी ५ रुग्णांमध्ये ( ७१ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २०१ झाली आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: 2085 (122)

ठाणे: 29 (2)

ठाणे मनपा: 96 (1)

नवी मुंबई मनपा: 63 (3)

कल्याण डोंबवली मनपा: 68 (2)

उल्हासनगर मनपा: 1

भिवंडी निजामपूर मनपा: 1

मीरा भाईंदर मनपा: 53 (2)

पालघर: 14 (1)

वसई विरार मनपा: 61 (3)

रायगड: 8

पनवेल मनपा: 28 (1)

ठाणे मंडळ एकूण: 2507 (137)

नाशिक: 3

नाशिक मनपा: 5

मालेगाव मनपा:  45 (2)

अहमदनगर: 19 (1)

अहमदनगर मनपा: 9

धुळे: 1 (1)

धुळे मनपा: ०

जळगाव: ०

जळगाव मनपा: 2 (1)

नंदूरबार: ०

नाशिक मंडळ एकूण: 84 (5)

पुणे: 17

पुणे मनपा: 450 (46)

पिंपरी चिंचवड मनपा: 37 (1)

सोलापूर: ०

सोलापूर मनपा: 12 (1)

सातारा: 7 (2)

पुणे मंडळ एकूण: 523 (50)

कोल्हापूर: 2

कोल्हापूर मनपा: 3

सांगली: 26

सांगली मिरज कुपवाड मनपा:०

सिंधुदुर्ग: 1

रत्नागिरी: 6 (1)

कोल्हापूर मंडळ एकूण: 38(1)

औरंगाबाद:०

औरंगाबाद मनपा: 28 (2)

जालना: 2

हिंगोली: 1

परभणी: ०

परभणी मनपा: 1

औरंगाबाद मंडळ एकूण: 32 (2)

लातूर: 8

लातूर मनपा: ०

उस्मानाबाद: 3

बीड: 1

नांदेड: ०

नांदेड मनपा: ०

लातूर मंडळ एकूण: 12

अकोला: 7 (1)

अकोला मनपा: ७

अमरावती: ०

अमरावती मनपा: 5 (1)

यवतमाळ:13

बुलढाणा: 21 (1)

वाशिम: 1

अकोला मंडळ एकूण: 54 (3)

नागपूर: 2

नागपूर मनपा: 55 (1)

वर्धा: ०

भंडारा: ०

गोंदिया: 1

चंद्रपूर: ०

चंद्रपूर मनपा: 2

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: 60 (1)

इतर राज्ये: 11 (2)

एकूण:  3320 (201)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 330 कंटेनमेंट झोन म्हणजे प्रतिबंधित क्षेत्र क्रियाशील असून आज एकूण 5850  सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी 20.50 लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

अन्य बातम्या

परभणीत खळबळ! लॉकडाऊनमध्ये 370 किमी प्रवास करणारा तरुण कोरोना पॉझिटिव्ह

मुंबईकरांना मोठा दिलासा! या 'रेड झोन' परिसरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट

राज्यातला पहिला कोरोनारुग्ण हाताळणाऱ्या नर्सचे अनुभव ऐकून कराल सॅल्युट!

First published: April 17, 2020, 11:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading