पुणे, 05 नोव्हेंबर : मेव्हण्याला जीवे ठार मारण्याच्या धमकी प्रकरणी पुण्यातील भाजपचे सहयोगी माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांना अटक करण्यात आली होती, पुणे जिल्हा (pune court) न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन देण्यात आला आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी उषा काकडे यांनाही न्यायालयाने जामीन दिला आहे.
संजय काकडे यांनी युवराज ढमाले (yuvaraj Dhamale )यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे ढमाले यांनी चतुःश्रुंगी पोलिसांकडे संजय काकडे आणि त्यांच्या पत्नी उषा काकडे यांच्याविरोधात फिर्याद दिली होती. आज जिल्हा न्यायालयात दोघांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. संजय काकडे जिल्हा न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयाने दोघांना 10 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे.
धूर आला मग आग भडकली अन् क्षणात झाला विस्फोट, बर्निंग कारचा VIDEO
युवराज ढमाले हे बांधकाम व्यावसायिक आहे. संजय काकडे आणि युवराज ढमाले हे भागीदार होते. पण, वाद झाल्यामुळे दोघे 2010 पासून वेगळे झाले होते. ऑगस्ट 2018 मध्ये संजय काकडे यांनी युवराज ढमाले यांना सुपारी देऊन जीवे ठार मारीन, अशी धमकी दिली होती. त्यानंतर ढमाले यांनी चतुःश्रुंगी पोलिसांमध्ये धाव घेतली होती.
बिहारमधील मोठी दुर्घटना, गंगा नदीत बोट बुडाली; 15 जण बेपत्ता
दरम्यान, 'हा कौटुंबिक वाद आहे. दोन वर्षांपूर्वी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने आता केला आहे. या दोन वर्षात फिर्यादीबरोबर माझं व पत्नीचं साधं बोलणं देखील झालेलं नसताना मग आताच हे आरोप का केले याचं आश्चर्य वाटत आहे. आता याची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. आज न्यायालयात प्रत्येकी 10 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. आम्ही न्यायालयाची प्रक्रिया पाळत आहोत' असं संजय काकडे यांनी सांगितले.