मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Pune: मैत्रिणीला दारू पाजून तरुणाचं धक्कादायक कृत्य; चार मित्रांना फोन करून बोलावलं अन्...

Pune: मैत्रिणीला दारू पाजून तरुणाचं धक्कादायक कृत्य; चार मित्रांना फोन करून बोलावलं अन्...

अकरावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं सोमवारी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.  (File Photo)

अकरावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं सोमवारी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. (File Photo)

Crime in Pune: एका युवकानं आपल्या मैत्रिणीला दारू पाजून (Force girlfriend to drink alcohol) तिच्यासोबत धक्कादायक कृत्य केलं आहे.

शिक्रापूर, 04 जुलै: पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर याठिकाणी एका युवकानं आपल्या मैत्रिणीला दारू पाजून (Force girlfriend to have alcohol) तिच्यासोबत धक्कादायक कृत्य केलं आहे. माझ्या चार मित्रांशी (4 friends) शारीरिक संबंध (Sexual Relation) ठेव म्हणत, आरोपीनं पीडित युवतीला दमदाटी करत मारहाण (Beat) केली आहे. याप्रकरणी पीडितेनं शिक्रापूर पोलीस ठाण्यात आरोपी युवकाविरोधात विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल केल आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केली नसून घटनेचा तपास सुरू केला आहे.

प्रवीण काळोखे असं विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपी तरुणाचं नाव आहे. शिक्रापूर येथील रहिवासी असणाऱ्या आरोपी प्रवीण काळोखे आपल्या दोन मित्रांसोबत आपल्या रुममध्ये बसला होता. दरम्यान त्यांना दारू पिण्याची लालसा झाल्यानं आरोपीनं आपल्या मैत्रिणीला फोन करून दारू घेऊन रुमवर येण्यास सांगितलं. पीडित तरुणी रुमवर गेली असता, आरोपीनं आपल्या अन्य दोन मित्रांना फोन करून रुमवर बोलावलं.

यावेळी सर्वांनी मद्यप्राशन केलं. आरोपी प्रवीणने त्याच्या मैत्रिणीला देखील आग्रह करत दारू पिण्यास भाग पाडलं. तरुणीला दारूची नशा येताच आरोपीनं युवतीला 'माझ्या मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेव' असं सांगितलं. भानावर येत युवतीनं आरोपीच्या मित्रांसोबत रिलेशन ठेवण्यास नकार दिला. तरीही आरोपीनं पीडितेला दमदाटी करायला सुरुवात केली. पण पीडितेनं आरोपीच्या दबावाला बळी न पडता, पुन्हा नकार दिला.

हेही वाचा-आईनंच 5 वर्षीय चिमुकलीच्या गुप्तांगात टाकला लोखंडी रॉड; धक्कादायक घटनेनं खळबळ

यामुळे चिडलेल्या आरोपी प्रवीणनं युवतीला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच दमदाटी करत मनास लज्जा निर्माण होईल असं कृत्य केलं. ही घटना घडल्यानंतर पीडित युवतीनं शिक्रापूर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी विनयभंगासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संतोष मारकड करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Pune, Sexual harassment