Home /News /mumbai /

IPL मध्ये सट्टा लावणाऱ्या 5 बुकींना अटक; लॅपटॉप, 9 मोबाईल मुंबई क्राइम ब्रॅंचनं केले जप्त

IPL मध्ये सट्टा लावणाऱ्या 5 बुकींना अटक; लॅपटॉप, 9 मोबाईल मुंबई क्राइम ब्रॅंचनं केले जप्त

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध (Kings XI Punjab) यांच्यात झालेल्या सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

    मुंबई, 06 ऑक्टोबर : यंदा आयपीएलचा तेरावा हंगाम (IPL 2020) युएइमध्ये आयोजित करण्यात आला आहे. प्रेक्षकांशिवाय ही स्पर्धा होत असली तरी चाहत्यांमध्ये उत्साह कायम आहे. यासत सट्टा बाजारातही उधाण आलं आहे. मुख्यत: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)संघावर सर्वात जास्त सट्टा लावला जात आहे. दरम्यान मुंबई क्राइम ब्रॅचनं आयपीएल सट्टा लावणाऱ्या 5 बुकींना अटक केली आहे. हे बुकी मुंबईत बसून युएइमध्ये होणाऱ्या आयपीएलवर सट्टा लावत होते. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध (Kings XI Punjab) यांच्यात झालेल्या सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी मुंबई क्राइम ब्रॅंचननं केलेल्या छापेमारीत पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या पाच बुकींकडून लॅपटॉप, 9 मोबाईल आणि राउटर जप्त करण्यात आले आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडून 44 हजार रोख रक्कमही क्राइम ब्रॅंचला मिळाली आहे. वाचा-फिंचला मैदानातच धमकी देऊन थांबला अश्विन, 'या' कारणामुळे केलं नाही आऊट! या सट्टा लावणाऱ्या पाच मुलांसह क्राइम ब्रॅंचला एका डायरी सापडली आहे. या डायरीमध्ये सट्टेबाजी करणाऱ्या इतर बुकींची नावं आणि त्याचं डिटेल्स मिळाले आहे. त्यामुळे लवकरच क्राइम ब्रॅंचकडून मोठी कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. सध्या ताब्यात घेतलेल्या पाच तरुणांची कसून चौकशी केली जात आहे. यांच्या मार्फत मुंबईत सट्टेबाजी करणाऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते. पाहा-चेन्नई विरुद्ध पंजाब सामना होता फिक्स? शेन वॉट्सनच्या ट्वीटमुळे चाहते संभ्रमात मुंबई इंडियन्सचा संघ बुकींचा आवडता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्सचा संघ बुकींचा आवडता आहे. मुंबई संघावर 4.90 रुपये इतका भाव लावण्यात आला आहे. मुंबई मागोमाग हैदराबादच्या संघाला बुकींकडून पसंती दिली जात आहे. ही स्पर्धा सुरू होण्याआधीच गुरुग्राम पोलिसांनी त्यांची इंटेलिजंट विंग, क्राईम ब्रांचचा एक चमू आणि सर्व जिल्ह्यांतील स्टेशन ऑफिसर यांना सट्टेबाजांवर नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. एकीकडे सट्टेबाजाराला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असताना बुकींनी मात्र आपल्या आवडत्या संघासाठी भावही ठरवले आहेत.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या