जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Pune : 11 वर्षांनंतर महिलेची झाली ऑक्सिजन सिलिंडरपासून सुटका, पाहा Video

Pune : 11 वर्षांनंतर महिलेची झाली ऑक्सिजन सिलिंडरपासून सुटका, पाहा Video

Pune : 11 वर्षांनंतर महिलेची झाली ऑक्सिजन सिलिंडरपासून सुटका, पाहा Video

प्राजक्‍ता दुगम यांची 11 वर्षांनंतर ऑक्सिजन सिलिंडर पासून सुटका झाली आहे.

  • -MIN READ Local18 Pune,Pune,Maharashtra
  • Last Updated :

    पुणे, 13 डिसेंबर : एलएएम हा एक दुर्मिळ, सिस्टिक फुफ्फुसाचा आजार आहे. ज्यामुळे फुफ्फुसाचे कार्य हळूहळू कमी होते. हा आजार प्रामुख्याने तरुण वयाच्या महिलांना होतो आणि प्रगत एलएएम असलेल्या महिलांसाठी फुफ्फुस प्रत्यारोपण हा एक आवश्यक उपचार पर्याय आहे. पुण्यातील सिंहगड रोड येथे राहणाऱ्या बँक कर्मचारी प्राजक्‍ता दुगम यांना हा एलएएम आजर झाला होता. त्यामुळे त्यांना ऑक्सिजन सिलिंडर बांधून कामावर जावे लागत होते. तब्बल 11 वर्ष प्राजक्ता यांनी या आजाराशी सामना केला. त्यावरचे उपचार अतिशय दुर्मिळ असतात मात्र प्राजक्ता यांना पुण्यातच उपचार घेणे शक्य झाले असून 11 वर्षांनंतर ऑक्सिजन सिलिंडर पासून त्यांची सुटका झाली आहे. याबाबत प्राजक्ता यांनी सांगितले की, 11 वर्षांपूर्वी मला नागिन झाली होती. आणि त्यातून मी ज्यावेळेस बाहेर पडले त्यावेळेस मला दम लागणे सतत होते. मी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र माझा हा त्रास जास्त वाढत गेला. एक दीड वर्ष मी दुर्लक्ष केल्यानंतर मला हा त्रास जास्त जाणवला. म्हणून मी डॉक्टरांकडे गेले. तर अनेकांनी मला विविध सल्ले दिले मात्र मला आजार कोणता झालाय याबद्दलचे कुठेही निदान होत नव्हते आणि जेव्हा निदान झाले त्यावेळेस समजले की मला हा एलएएम दुर्मिळ आजार आहे. त्यावरती उपचार दुर्मिळ असतात. मात्र, आता माझ्या आजरावती उपचार झाले असून मी लवकरात लवकर यातून बाहेर पडेल अशी अपेक्षा आहे.

    तेलकट खाणं नकोस वाटतं? पुण्यात खा ऑइल फ्री दहीवडा! video

    ज्या मुलीचे मला अवयव मिळाले आहेत ती माझ्या पेक्षा लहान होती. मात्र, तिच्या आई-वडिलांबद्दल मला फारच कृतज्ञता वाटते. कारण की त्यांनी आपल्या दुःखाला बाजूला सारून आपल्या मुलीचे अवयवदान करून दुसऱ्याला एक नवीन आयुष्य दिले आहे. खर तर समाजामध्ये अशी अवयदान करणारी लोक असणे गरजेचे आहे. आपल्या नंतर देखील आपल्या आवयवांच्याद्वारे आपण जिवंत राहू शकतो. तसेच मी माझी स्वतःची काळजी घेऊन ज्या मुलीचे मला अवयव मिळालेले आहेत. तिच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल तसेच मी स्वतःची देखील व्यवस्थित काळजी घेईल, असं प्राजक्ता यांनी सांगितलं. या जटिल शस्त्रक्रियेच्या यशाबद्दल बोलताना डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती म्हणाले की, ही जटिल शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे घोषित करताना मला खूप आनंद होत आहे. पुण्‍यात पहिल्‍यांदाच अशाप्रकारची ऐतिहासिक शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली आहे. एकाच वेळी हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपणाने आमच्‍या संस्‍थेला अवयव प्रत्यारोपणात आघाडीवर नेले आहे. डीपीयूमध्ये आम्ही समाजातील सर्व घटकांना अत्याधुनिक सुविधा आणि अनुभवी डॉक्टर व कर्मचारी यांच्या सहयोगाने शक्य तितके सर्वोत्तम उपचार देण्यासाठी समर्पित आहोत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: Local18 , pune
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात