मराठी बातम्या /बातम्या /पुणे /अखेर पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारने जेरबंद; साताऱ्यात सापळा रचून केली अटक

अखेर पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारने जेरबंद; साताऱ्यात सापळा रचून केली अटक

तुरुंगातून सुटका होताच 300 गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणूक काढणाऱ्या कुख्यात गुंड गजा मारणे याला सातारा पोलिसांनी जेरबंद केलं आहे.

तुरुंगातून सुटका होताच 300 गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणूक काढणाऱ्या कुख्यात गुंड गजा मारणे याला सातारा पोलिसांनी जेरबंद केलं आहे.

तुरुंगातून सुटका होताच 300 गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणूक काढणाऱ्या कुख्यात गुंड गजा मारणे याला सातारा पोलिसांनी जेरबंद केलं आहे.

सातारा, 6 मार्च : तुरुंगातून सुटका होताच 300 गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणूक काढणाऱ्या कुख्यात गुंड गजा मारणे याला सातारा पोलिसांनी जेरबंद केलं आहे. पुणे पोलिसांनी गुंगारा देत सातारा जिल्ह्यात प्रवेश केला होता. आणि आज अखेर कुख्यात गुंड गजा मारणे याला अटक केली आहे. मेढा पोलिसांनी पाठलाग करुन गजा मारणे याला जेरबंद केलं आहे.

तुरुंगातून सुटका होताच 300 गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणूक काढणाऱ्या कुख्यात गुंड गजा मारणे याला 17 फेब्रुवारी रोजी कोथरूड पोलिसांनी न्यायालयात हजर केलं होतं. मात्र कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही रॅली न आल्याने आणि कायद्याचे उल्लंघन केले नसल्याचा दावा गजानन मारणे याने केला होता आणि हा दावा न्यायालयाने मान्य केल्यामुळे गजा मारणेचा जामीन न्यायालयाने मंजूर केला होता.

काही दिवसांपूर्वी अमोल बधे आणि पप्पू गावडे यांच्या खूनातून निर्दोष मुक्तता झालेल्या मारणे टोळीचा म्होरक्या कुख्यात गुंड गजानन मारणेची (gajanan marne) थेट तळोजा कारागृहापासून पुण्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.

हे ही वाचा-पुण्यातील आणखी एका कुख्यात गुंडाच्या मुसक्या आवळल्या, राहत्या घरातून केली अटक

धक्कादायक बाब म्हणजे, अगदी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून ही जवळपास 300 चारचाकी गाड्या घेऊन ही मिरवणूक काढण्यात आली होती. चार वर्षांपूर्वी पंधरा दिवसात अमोल बधे, पप्पू गावडे आणि एकाचा खून करून मारणे टोळीने दहशतीचा नवा अध्याय शहरात सुरू केला होता.  सलग झालेल्या खूनानंतर शहरात टोळी युद्धाचा भडका उडेल अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पुणे पोलिसांनी मारणे टोळीवर मोक्का कायद्याने कारवाई करत जवळपास तीन वर्ष गजानन मारणे याला कारागृहात जेरबंद करून ठेवलं होतं. मात्र, दहशतीच्या जोरावर सीसीटीव्ही सारखे पुरावे असताना ही पुणे शहराच्या मधावर्ती भागात झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात एकही साक्षीदार खटल्याच्या सुनावणी दरम्यान पोलीस टिकवू शकले नाहीत आणि या सगळ्या गुन्ह्यातून गजानन मारणेची निर्दोष मुक्तता झाली होती.

First published:

Tags: Gajanan marane, Pune, Satara