मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुण्यातील आणखी एका कुख्यात गुंडाच्या मुसक्या आवळल्या, राहत्या घरातून केली अटक

पुण्यातील आणखी एका कुख्यात गुंडाच्या मुसक्या आवळल्या, राहत्या घरातून केली अटक

Pune Gangster Nilesh Ghayval : निलेश घायवळ याच्यावर एमपीडीए अंतर्गत धोकादायक व्यक्ती म्हणून स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.

Pune Gangster Nilesh Ghayval : निलेश घायवळ याच्यावर एमपीडीए अंतर्गत धोकादायक व्यक्ती म्हणून स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.

Pune Gangster Nilesh Ghayval : निलेश घायवळ याच्यावर एमपीडीए अंतर्गत धोकादायक व्यक्ती म्हणून स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.

पुणे, 3 मार्च : पुण्यातील गँगस्टर निलेश घायवळ (Pune Gangster Nilesh Ghayval) याच्यावर काही काळापूर्वी तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र असं असतानाही त्याच्यावर पुणे जिल्ह्यातील भिगवण (Bhigwan) येथे एकाचे अपहरण करुन खंडणी मागितल्याचा गुन्हा भिगवण पोलीस ठाण्यात दाखल झाला. त्यामुळे निलेश घायवळ याच्यावर एमपीडीए अंतर्गत धोकादायक व्यक्ती म्हणून स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री त्याला नगर जिल्ह्यातील जामखेडमधून त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली आहे.

पुण्यातील कुख्यात गुंड गज्या मारणे याच्यानंतर पुणे पोलीस घायवळच्या शोधात होते. गोपनीय पद्धतीने आणि शिताफीने भिगवण व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी निलेश घायवळला बेड्या ठोकल्या आहेत. मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात काही गँगस्टरने डोके वर काढण्यास सुरुवात केली होती. याचाच एक भाग म्हणून कारागृहातून बाहेर येताच गज्या मारणे याने रॅली काढून दहशत माजवली होती.

एकेकाळी निलेश घायवळ आणि गजा मारणे यांच्यामध्ये मोठे गँगवार झाले आहेत. निलेश गायवळ याच्यावर एकूण 12 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. सध्या हे दोघेही जेलमधून बाहेर आले होते आणि त्यामुळे पुन्हा एकदा शहरात गँगवार होऊ नये, यासाठी पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे.

याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली असून घायवळची येरवडा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. पुढील एक वर्षासाठी त्याला स्थानबद्ध करण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी काळात पोलिसांकडून गजानन मारणे याच्यावरही कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

First published:
top videos

    Tags: Pune (City/Town/Village), Pune crime news, Pune police