Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /देश /

आई ओरडली म्हणून मुलीनं घर सोडलं; आसरा देण्याच्या बहाण्यानं 6 जणांनी केला सामूहिक बलात्कार

आई ओरडली म्हणून मुलीनं घर सोडलं; आसरा देण्याच्या बहाण्यानं 6 जणांनी केला सामूहिक बलात्कार

उल्हासनगरमध्ये 31 वर्षीय मामाने आपल्या 6 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

उल्हासनगरमध्ये 31 वर्षीय मामाने आपल्या 6 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

आईच्या ओरडल्यानं घर सोडलेल्या एका अल्पवयीन मुलीला आसरा देण्याचा बहाण्यानं (pretext of providing shelter) तिच्यावर सहा जणांनी सामूहिक बलात्कार (Gang rape on minor girl) केल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

लखनऊ, 16 जून: किरकोळ कारणावरून आई ओरडली म्हणून एका अल्पवयीन मुलीनं रागाच्या भरात घर सोडल्याची घटना समोर आली आहे. घर सोडल्यानंतर या अल्पवयीन मुलीला आसरा देण्याचा बहाण्यानं (pretext of providing shelter) सहा जणांनी सामूहिक बलात्कार (Gang rape on minor girl) केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपींच्या मुसकळ्या आवळल्या (6 Arrest) आहेत. या संतापजनक घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

संबंधित घटना उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या ग्रामीण भागातील इटौंजा येथील आहे. किरकोळ कारणावरून आई ओरडली म्हणून एका 14 वर्षाच्या अल्पवयीनं रागात घर सोडलं होतं. पुन्हा घरात पाऊल ठेवणार नाही, अशी आई-वडिलांना धमकी देऊन ही मुलगी घराबाहेर पडली होती. ती घराबाहेर पडल्यानंतर कुटुंबीयांनी तिचा अनेक ठिकाणी शोध घेतला. मात्र तिचा काही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे अखेर तिच्या वडिलांनी इटौंजा पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

तर, दुसरीकडे उपाशी पोटी घराबाहेर पडलेली पीडित मुलगी भूकेन व्याकुळ झाली होती. दरम्यान एका रिक्षावाल्यानं तिची विचारपूस केली. तसेच आपल्या घरी येण्याचा आग्रह केला. आपल्या घरी तुझी चांगली व्यवस्था करतो. तुला पोटभर जेवू घालतो, अशी भाबडी आशा दाखवत आरोपीनं तिला आपल्या घरी नेलं. याठिकाणी आरोपीनं जेवायला घेऊन येतो, असं सांगून घराबाहेर पडला आणि त्यानं आपल्या अन्य पाच मित्रांना फोन करून बोलावून घेतलं.

हे ही वाचा-लग्नाचं आमिष दाखवून IAS अधिकाऱ्यानं MBBS तरुणीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप

यानंतर आरोपी रिक्षाचालकासह अन्य पाच जणांनी 14 वर्षीय पीडितेवर एकापाठोपाठ एक सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी पीडितेला जेवण तर सोडाच पाणी देखील दिलं नाही. याऊलट तिचा अमानुष छळ केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी तातडीनं पावलं उचलत आरोपी रिक्षाचालक इकरामुद्दीन याच्यासह त्याचे मित्र शकील, मोहम्मद नफीस, नूर मोहम्मद, रितेश यादव आणि उत्तम शर्मा अशा सहा आरोपींना अटक केली आहे. बाल लैंगिक अत्याचारासह अन्य कलामांतर्गत पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

First published:

Tags: Gang Rape, Rape on minor, Uttar pradesh